केज । जिल्हा प्रतिनिधी प्रकाश मुंडे :-
शासन-प्रशासन दरबारी खितपत पडलेल्या व दुर्लक्षित असणाऱ्या ब्राह्मण समाजाच्या प्रलंबित मागण्यांचे स्मरण करून देण्यासाठी केज तहसिल समोर ब्राह्मण समाजाने रस्त्यावर उतरत पळी-ताम्हण वाजवून जागो सरकार जागोचा नारा देत परिसर दणाणून टाकला.
ब्राह्मण समाजाच्या उन्नतीसाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून एक हजार कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात यावी, के.जी.टू पी.जी.शिक्षण मोफत देण्यात यावे, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मुलामुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह स्थापन करण्यात यावे यासह इतर विविध मागण्यांसाठी समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून शासन-प्रशासन दरबारी पाठपुरावा सुरू आहे, अनेक आंदोलने निवेदने सरकार दरबारी लाल बसत्यात खितपत पडली आहेत. ब्राह्मण समाजाच्या मागण्यांकडे सर्वच राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधी हे दुर्लक्ष करत असल्याची भावना समाजाच्या मनात निर्माण झाल्याने ब्राह्मण समाज संघर्ष समिती च्यावतीने राज्यात प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात १ जानेवारी ते २२ जानेवारी २०२१ या कालावधीत पळी-ताम्हण वाजवून सरकारला प्रलंबित मागण्यांचे स्मरण करून देण्यासाठी जागो सरकार जागो नारा दिला आहे त्याचाच भाग म्हणून मंगळवार दि.१९ जानेवारी रोजी येथील तहसील कार्यालयासमोर पळी-ताम्हण वाजवत तहसील कार्यलयासमोर ब्राह्मण संघर्ष समिती च्या या अनोख्या पळी-ताम्हणचा आवाज केज करासाठी चर्चेचा विषय ठरला या पळी-ताम्हण आंदोलनाचा समारोप २२ जानेवारी २०२१ शुक्रवार रोजी औरंगाबाद येथे आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करून होणार असून औरंगाबाद येथे होणाऱ्या आंदोलनात समाजबांधव, महिला भगिनी, युवक युवतींनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन समितीचे मुख्य समन्वयक धनंजय कुलकर्णी यांनी केले आहे .
यावेळी ना. त. सचिन देशपांडे यांना मागण्याचे निवेदन दिले श्रीनिवास केजकर , श्रीधर खोत , श्रीराम शेटे , समीर देशपांडे , अनंत कोकीळ , विश्वास शेटे , विजय क्षीरसागर , सुनिल कुलकर्णी , ऋषिकेश जोशी , प्रदिप कुलकर्णी , अतुल कुलकर्णी , पी एस लहुरीकर , व्यकंट पांडव , अतुल कुलकर्णी , दत्तात्रय कुलकर्णी , उध्दव रामदासी , राहुल कुलकर्णी अंबाजोगाई , चंद्रकांत पाटील , अतुल र , अभिजीत शेटे , अभय कुलकर्णी , गुणवंत जोशी आदी उपस्थित होते . किरण कुलकर्णी व गणेश कुलकर्णी यांनी पण या आंदोलनात सहभाग नोंदवला.
.त्याच बरोबर यानंतरही सरकार जागे झाले नाही समाजाच्या मागण्या मान्य केल्या नाही त्यावर योग्य निर्णय तात्काळ न घेतल्यास पुढील आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे .

