shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पद्मश्री पुरस्कार प्राप्त गिरीश प्रभुणे यांच्या संस्थेला पालिकेची नोटीस, ‘सात दिवसात कर भरा..!

पिंपरी चिंचवड:-पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेले गिरीश प्रभुणे यांच्या क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचालित पुनरुत्थान समरसता गुरुकुलम संस्थेला महापालिकेने मालमत्ता कर थकविल्याची नोटीस दिली आहे. संथेने १ कोटी ८३ लाख मालमत्ता कर थकविला आहे. तसेच २५ लाखांच्या पुढील थकबाकी असलेल्या ३२५ मालमत्ताधारकांनाही महापालिकेने नोटीसा दिल्या आहेत. सात दिवसांच्या आत थकबाकी भरावी. अन्यथा मालमत्ता सील करण्याचा इशारा दिला आहे.

पिंपरी चिंचवड शहरात आजअखेर ५ लाख २७ हजार ३३८ मालमत्ता आहेत. त्यामध्ये निवासी ४ लाख ४७ हजार ८, बिगरनिवासी ४६ हजार ८२८, औद्योगिक ३ हजार ७००, मोकळ्या जागा ८ हजार ७८१, मिश्र १५ हजार ८१९ आणि इतर ५ हजार २०२ मालमत्ता आहेत. या मालमत्तांना महापालिकेकडून कर आकारणी केली जाते. परंतु, अनेक मालमत्ताधारकांनी कराचा भरणा केला नाही. कर थकविला आहे. त्यामुळे महापालिकेचे उत्पन्न बुडत आहे.
close