सावळीविहीर (प्रतिनिधी) : बहुप्रतीक्षेत असणारी covid-19 यावरील प्रतिबंधात्मक लस राहाता तालुक्यातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यास राहाता ग्रामीण रुग्णालयात मोठ्या उत्साहात आज सुरुवात झाली आहे. त्यामुळे राहाता तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्राबरोबरच सर्व क्षेत्रामधून, नागरिकांमधून मोठा आनंद व समाधान व्यक्त होत आहे.
आज शनिवार दिनांक 16 जानेवारी रोजी राहाता ग्रामीण रुग्णालयात सर्व ग्रामीण व प्राथमिक आरोग्य केंद्र यांचे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी अशा एकूण शंभर वैद्यकीय कर्मचाऱ्यांना ,अधिकाऱ्यांना कोरोनाची प्रतिबंधात्मक लस आज सकाळी देण्यात आली.
प्रथम राहाता ग्रामीण रुग्णालयात कोरोणा प्रतिबंधक लस देण्यास आज सुरुवात झाली आहे.एकूण 300 या लसीकरणाचे डोस आले असून लसीकरणामुळे वैद्यकीय कर्मचारी,अधिकारी व नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
या यावेळी शिर्डी चे प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तसेच राहताचे तहसीलदार कुंदन हिरे, शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान चे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे, राहाता तालुकाआरोग्य अधिकारी डॉक्टर प्रमोद म्हस्के, राहाता पंचायत समितीचे गट विकास अधिकारी समर्थ शेवाळे ,राहाता ग्रामीण चे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गोकुळ घोगरे, डॉक्टर स्वाती म्हस्के, डॉक्टर गागरे ,आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
देशाच्या , राज्याच्या निदर्शकां नुसार ,आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार राहाता ग्रामीण रुग्णालयात तिनशे कोरोणा प्रतिबंधक लसीकरणाचे डोस आले असून आज शनिवार दिनांक 16 जानेवारी रोजी राहाता तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय ,प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच इतर रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी ,कर्मचारी, आरोग्य सेवक ,सेविका यांना एकूण 100 कोरेणाचे प्रतिबंधक लसीकरणाचे डोस मोठ्या उत्साहात देण्यात आले. यावेळी राहाता ग्रामीण रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गोकुळ घोगरे यांनी सांगितले की, राहाता ग्रामीण रुग्णालयात हे ३०० प्रतिबंधक लसीकरण डोस आले असून प्रथम वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना ते देण्यात आले आहेत व येत आहेत. ते दिल्यानंतर संबंधित व्यक्तीची आरोग्य विभागामार्फत निगराणी करण्यात येत आहे .हे सर्व जण या लसीकरण दिल्यामुळे खुश,आनंदी आहेत.
असे यावेळी घोगरे यांनी सांगितले.यावेळी सर्व वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
लशीकरण घेतलेल्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून ही मोठे समाधान व्यक्त होत होते.राहाता ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर गोकुळ घोगरे यांनी प्रथम पाच आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांना या कोरोणा प्रतिबंधक लसी चे इंजेक्शन देऊन उत्साहात सुरुवात केली व सर्वांनी टाळ्या वाजवून या लसीकरण प्रारंभाचे उत्साहात स्वागत केले. यावेळी राहता ग्रामीण रुग्णालयातील अनेक डॉक्टर आरोग्य सेवक उपस्थित होते.

