shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नगर तालुक्यातील ग्रामपंचायत चुरशीत पार पडल्या..!!

रूईछत्तीस-प्रतिनिधी (शिवा म्हस्के ):
नगर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक चुरशीची पार पडली. रुईछत्तीसी येथे पंचायत समिती उपसभापती रवींद भाटकर, श्रीकांत जगदाळे, रमेश भांबरे, वाळूंज येथे बाजार समिती उपसभापती संतोष म्हस्के यांच्या पत्नी अर्चना म्हस्के,माजी पंचायत समिती सदस्य प्रमिला दरेकर,माजी संरपच पर्वती हिंगे,दरेवाडी येथील संरपच अनिल करांडे यांच्या विरोधात लहु बेरड, वाटेफळ येथे रवी अमृते यांच्या पत्नी जयश्री अमृते,दत्तानारळे यांच्या पत्नी नंदा नारळे, शिराढोण पाच जागा बिनविरोध झाल्या.
दोन वाॅर्डमध्ये निवडणूक झाली. येथे दादासाहेब दरेकर आणि वाघ,दरेकर अशी चुरशीची लढत पाहावयास मिळाली मतदान प्रक्रिया संपल्यानंतर पेटी सिल झाल्या नंतर आता एकच उत्सुकता निकालाची गावातील  चहा टपरी ,पारावर गर्दीच गर्दी चर्चाचा‌ विषय एकच कोण बाजी ‌मारणार महाविकास आघाडी की भाजप कोणता पॅनल विजयी होणार... निकालाची आतुरतेने वाट उमेदवार आणि मतदार पाहात आहेत.  परिवहनमहा मंडळाच्या बसेस पेट्या संकलन करत निघुन गेल्या.
 

रुईछत्तीसी ८७ %
वाटेफळ ८५  %
मठपिंप्रि ८४.३४%
हाताळणं ९० %
वाळूंज ८८.११ %
पारगाव ७५ %
शिराढोण ५५  %
दरेवाडी  ८५ % 
गुंणवडी ८४ .३३%

अशी गावानिहाय टक्के वारी आहे.
close