shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कोरोना महामारी सोबत संपूर्ण जग लढत आहे,रक्तदान करून आपण या लढ्यात सहभागी होऊया,माईंना अनोखे अभिवादन करूया..!!


कोळपेवाडी(प्रतिनिधी)-विशाल लोंढे
रक्तदानामुळे दुसऱ्याचा आपण कठीण समयी जीव वाचवू शकत असल्याने रक्तदान हि मोठी सामाजिक जबाबदारी असल्याने तरुणांनी हि चळवळ जोमाने चालवली पाहिजे असे प्रतिपादन कर्मवीर एजुकेशन सोसायटीचे विश्व्स्थ सय्यद सिकंदर चांद पटेल यांनी नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना आज केले आहे.
 
   कोपरगाव तालुक्यातील गौतमनगर येथील कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सुशिलामाई काळे कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने स्वर्गवासी सौ. सुशीलामाई काळे यांच्या पुण्यस्म्यर्ण  दिनानिमित्त संजीवनी ब्लड बँकेच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते त्यावेळी ते  बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या. डॉ. विजया गुरसळ या होत्या.

या वेळी संजीवनी ब्लड बँकेच्या नीता पाटील म्हणाल्या की, आज तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले तरीही रक्त हे कोणत्याही प्रयोगशाळेत निर्माण करता आलेले नाही.संपूर्ण जगामध्ये कोरोना या महामारीने थैमान घातले असून त्यामुळे या

रक्तदानाकडे आपण समाजसेवा म्हणून देखील
पाहू शकतो. सौ. सुशीलामाई यांनी कोपरगाव तालुक्यात गोरगरीब जनतेसाठी अनेक सामजोपयोगी कामे केली असून त्या समाजसेवेत आपलाही सहभाग व्हावा ही भावना डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या पुण्यसमरण दिनानिमित्त जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी रक्तदान करावे असे आवाहन त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले.

महाविद्यालयातील प्रा. कुलकर्णी यांनी माईंचे कार्य व रक्तदानाविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. संतोष जाधव यांनी करून दिला तर या शिबिरामध्ये बहुसंख्य रक्तदात्यांनी रक्तदान केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा. विशाल पोटे व प्रा. उमाकांत कदम यांनी केले तर प्रा. उमाकांत कदम यांनी आभार मानले.
close