shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सातारा जिल्ह्यातील धनगरवाडीच्या ग्रामपंचायतच्या धाडसी मतदारांचे धाडस... सलाम धाडसाला..!!

देशात निवडणूक आयोगाने NOTA चा पर्याय दिला.. NOTA म्हणजे वरील पैकी एक देखील उमेदवार लायक नाही..

प्रत्येक तालुक्यात गावात गावातील नेते जनतेला न पटणारे उमेदवार देतात.. बरेच उमेदवार भ्रष्टाचारी अशिक्षीत व्यसनी असतात.. मतदारांना पसंत नसतात पण आण्णा आबा साहेब दादा वहीनी ताई माई आक्का सोबत पंगा कुणी घ्यायचा..! स्वतंत्र भारतात आज देखील गुलाम व गुलाम माणसीकता जिवंत आहे.

भारतीय राज्य घटनेने लोकशाहीत मतदाराला खूप अधिकार दिलेत.. ना लायक उमेदवाराला नाकारण्यासाठी NOTA दिला.. पण तो अधिकार वापरण्याचे धाडस मात्र पहिल्यांदा सातारा जिल्ह्यातील धनगरवाडीच्या मतदाराने दाखवून NOTA ला सर्वाधिक मतदान करून इतिहास घडवला...!

त्रिवार मानाचा मुजरा ह्या NOTA ला मतदान करून चुकीचे उमेदवारांना नाकारून ते मतदार दुबळे नसल्याचे उदाहरण घडवल्या बद्दल...!!

आज मी संकल्प केला ह्यापुढे मी प्रत्येक निवडणूकीत NOTA चा प्रचार करणार व मतदाराला NOTA चे महत्व पटवणार..

संजय भास्करराव काळे
कोपरगाव.
close