shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पिंपरी चिंचवडतील श्री संत तुकाराम महाराज पालखी तळाचे सुशोभीकरण त्वरित सुरू करावे; फेहमिदा जावेद शेख यांची मागणी..!!


पिंपरी चिंचवड:-आकुर्डी श्री विठ्ठल मंदिरा समोरील जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी तळाचे सुशोभीकरण त्वरित सुरू करण्याची मागणी दिवंगत नगरसेवक जावेद शेख यांच्या पत्नी फेहमिदा शेख यांनी महापालिकेकडे केली आहे.

याबाबत अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात फेहमीदा जावेद शेख यांनी म्हटले आहे की, आकुर्डी श्री विठ्ठल मंदिर समोरील जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी तळाचे सुशोभीकरणाबाबत माझे पती दिवंगत नगरसेवक जावेद शेख यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला आहे.

९ जानेवारी २०२० रोजी याबाबत सर्व विभागाच्या  अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली होती. या बैठकीत अतिरिक्त आयुक्त अजित  पवार यांनी आदेश दिले होते. स्वतः श्री विठ्ठल मंदिर परिसरात समक्ष भेट दिली होती. त्याला एक वर्ष होत आले. तरी काम मार्गी लागले नाही.

दरवर्षी आकुर्डी येथील श्री विठ्ठल मंदिर येथे श्री संत तुकाराम महाराज यांची पालखी मुक्कामी असते. शहरातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असल्याने हे काम लवकर सुरू करण्याची मागणी, फेहमिदा जावेद शेख यांनी केली आहे.
close