शेळगाव येथील भारत ननवरे यांना बेटी फाउंडेशन वणीच्या वतीने २०२० चा राज्यस्तरीय समाजभुषण व कोवीड योद्धा पुरस्कार प्राप्त...!!
इंदापूर प्रतिनिधी ( तात्याराम पवार)
शेळगाव: (२ जाने.२०२१)बेटी फाउंडेशन वणीच्या वतीने सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना समाजभुषण पुरस्कार देण्यात येतो.यावर्षी कोवीड १९ महामारीमुळे फाउंडेशनच्या वतीने आॕनलाईन लिंक द्वारे विविध क्षेत्रात काम करण्यांची या पुरस्कारासाठी फोटोसह माहिती मागितली होती.
यामध्ये जि. प .शाळा कौठळी येथे कार्यरत असणारे उपशिक्षक भारत ननवरे यांनी शाळेत मुलांच्या गुणवत्तेसाठी व शाळा नावारूपाला आणणेकामी विविध उपक्रम घेवून पालकांच्या सहकार्याने शाळेचा नावलौकिक वाढविला.त्याचप्रमाणे गरीब मुलांना शैक्षणिक मदत मिळवून दिली.शिक्षक समिती संघटनेच्या माध्यमातून मुख्यमंत्री सहायता निधी व शिवभोजन थाळीस आर्थिक मदत , वन्य प्राण्यांच्या पिण्याच्या पाणी सोय , कोवीड १९ काळात कोवीड केअर , सर्वेक्षण , रॕपीड टेस्ट अशा माध्यमातून कोवीड योद्धा म्हणून भुमिका बजावली.या सर्व कामांची दखल घेवून बेटी फाउंडेशन वणी यांनी भारत ननवरे यांना समाजभुषण व कोवीड योद्धा पुरस्कारासाठी निवड केली .सदर सन्मानचिन्ह , मेडल , सन्मानपञ , शाल कुरियर च्या माध्यमातून प्राप्त झाले आहे.
बेटी फाउंडेशन वनीच्या वतीने सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल
पंचायत समितीच्या सभापती स्वाती शेंडे व माजी सभापती करणसिंह घोलप यांनी भारत ननवरे यांचा पंचायत समितीच्या वतीने सन्मान केला.त्याचप्रमाणे शिक्षक समिती व जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने तालुकाध्यक्ष संतोष हेगडे , उपाध्यक्ष प्रताप शिरसट यांनी अभिनंदन केले.

