अहमदनगर दि. 22 :- भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांचे निर्देशानुसार 225- अहमदनगर शहर विधानसभा मतदार संघात तसेच 223- राहुरी, 224- पारनेर, 226- श्रीगोंद विधानसभा मतदार संघातील अहमदनगर तालुक्यातील समाविष्ट मतदार संघात दिनांक 25 जानेवारी, 2021 रोजी 11 वा राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात येणार आहे.
त्या अनुषंगाने 18 वर्षे पुर्ण केलेल्या नविन तरुण मतदारांचा मतदार यादीत समावेश करुन घेणे व त्यांचा मतदान प्रक्रिये सहभाग वाढविणे हा प्रमुख उद्देश आहे. नविन मतदारांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.

