इंदापूर तालुक्यात ५७ ग्रामपंचायतीचे उद्या होणार मतदान..!!
इंदापूर प्रतिनिधी: (१४ जाने.२१)
महाराष्ट्रातील १४हजार २३४ ग्रामपंचायतींची निवडणूक उद्या होणार असून पुणे जिल्ह्यातील महत्वाचा तालुका असलेल्या इंदापूर तालुक्यात ६० ग्रामपंचायतीची निवडणूक होत आहे.६० पैकी ३ ग्रामपंचायत बनविरोध झाल्या असून उर्वरित ५७ ग्रामपंचायतीचे प्रत्यक्षात मतदान उद्या होत आहे.
२७१ मतदान केंद्रावर महसूल व पोलीसच्या २७१ संयुक्त टीम असून प्रत्येक टीम मध्ये सहा सदस्य आहेत. इंदापूर तालुक्यातील १५ गांवे हि उपद्रवी असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस फौज फाटा तैनाती करण्यात येणार आहे.आज सकाळपासूनच मतदान निर्णय अधिकारी व कर्मचारी आपापल्या टीमसोबत मतदान केंद्राकडे मतपेट्या घेऊन रवाना झाले आहेत.
या कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामकाजाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. प्रशिक्षणात प्रत्यक्ष मतदान केंद्रावर आदर्श आचारसंहिता नियमांचे पालन, मतदान यंत्र हाताळणी, मतदान यंत्राची प्राथमिक माहिती तसेच कोरोना संसर्ग काळात घ्यावयाची काळजी यासह मतदान प्रक्रिया बाबत मार्गदर्शन केले आहे. सदर प्रशिक्षणास पाठवण्यात येणाऱ्या निवडणुकीचे अधिकारी म्हणून शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी, इंदापूर तहसील कार्यालयातील सर्व नियुक्त कर्मचारी उपस्थित होते.

