shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

ऊर्जामंत्री व महावितरण अधिकाऱ्यांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात यावे; मनसेच्यावतीने पोलीस निरीक्षकांना निवेदन..!!

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रभर ऊर्जामंत्री व महावितरण अधिकारी यांच्या विरोधात फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत यासाठी पोलिसांना निवेदन देण्यात येत असून त्याच अनुषंगाने श्रीरामपूर येथील मनसे पदाधिकाऱ्यांच्यावतीने देखील शहर पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले.

त्याप्रसंगी मनसेच्यावतीने सांगण्यात आले की, लॉकडाऊनच्या कालावधीत लोकांच्या हाताला काम - धंदा नसल्याकारणाने तथा आर्थिक उत्पन्न नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेले होती,अशात ते भरमसाठ आलेली विजबिले भरणार तरी कशी ? यामुळे सर्व वीज ग्राहकांचे विज बिल माफ करण्यात यावी अशा अशयाचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने संपूर्ण महाराष्ट्रात दिले जात आहे, याबाबत मनसेच्यावतीने मागे मोर्चे काढून आंदोलनेही करण्यात आले होते.

याची दखल घेऊन महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिवाळीच्या सणाच्या वेळेस तमाम महाराष्ट्रातील जनतेला वीज बिलामध्ये सवलत देऊन गोड बातमी देऊ असे आश्वासन दिले होते, त्यामुळे नागरिकांनी लाईट बिल भरले नाही, परंतु ज्यांनी मंत्रीमहोदयांच्या शब्दावर विश्वास ठेवून लाईट बिल भरले नाही  आशा नागरिकांना भरमसाठ व्याज लावून पुन्हा जास्तीचे लाईट बिल पाठविण्यात आले, तसेच काही दिवसांपूर्वी  संबंधित मंत्र्यांनी व अधिकार्‍यांनी लाईट बिल शक्तीने वसूल करावे व जे लोकं लाईट बिल भरणार नाही अशांचे लाईट कट करण्याचे आदेश देण्यात आले.

त्यामुळे महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री नितीन राऊत तसेच उर्जा सचिव व महावितरण अधिकारी  यांच्या विरोधात ‘संगनमत करुन मानसिक क्लेश, आर्थिक लुबाडणूक व फसवणुक केल्याचा गुन्हा’ दाखल करण्यात यावा असे श्रीरामपूर येथील पोलीस निरीक्षक यांना मनसेच्यावतीने लेखी स्वरुपात तक्रार व निवेदन देऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेना श्रीरामपूरच्यावतीने अक्रोश व्यक्त करण्यात आले आहे..

याप्रसंगी बाबासाहेब शिंदे मनसे जिल्हाध्यक्ष, तुषार बोबडे जिल्हा सचिव, डॉक्टर संजय नव्हतं जिल्हा सरचिटणीस, सुरेश जगताप उपजिल्हाध्यक्ष, उदय उदावंत उपजिल्हाध्यक्ष मनविसे, सुभाष सोनवणे तालुकाध्यक्ष, गणेश दिवसे शहराध्यक्ष, राहुल दातीर तालुकाध्यक्ष मनविसे, विशाल शिरसाट शहराध्यक्ष, मनविसे. कामगार सेनेचे सुपर चिटणीस नंदू गंगावणे.निलेश सोनवणे शहर संघटक. अमोल साबणे तालुका सचिव. भास्कर सरोदे तालुका उपाध्यक्ष. सागर इंगळे संकेत. शेलार प्रमोद शिंदे अमोल साबणे गणेश राऊत शहर उपाध्यक्ष. अक्षय सूर्यवंशी मनविसे शहर सचिव.विकास शिंदे. अतुल तारडे.मारुती शिंदे. करण कापसे. सागर त्रिभुवन. सतीश कुलकर्णी. बाबासाहेब भालेराव. बाप्पू लबडे. आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
close