इंदापूर येथील रुग्णवाहिका चालक नितीन(मामा)खिलारे यांनी दाखविले माणुसकीचे दर्शन.
श्रीयश नलवडे व सहकारी मित्राकडून नितीन मामांचा सत्कार:
इंदापूर प्रतिनिधी:(दि. ३) रोजी इंदापूर अकलुज रोडवर विठ्ठलवाडी येथे ट्रक व कार या अपघातात केदुर ता. पाबळ येथील माजी सैनिक व त्यांच्या पत्नीचे दुर्दैवाने निधन झाले. या संकटकाळी प्रसंगी इंदापूर मधील रुग्णवाहिका चालक नितीन पांडूरंग खिलारे यांनी प्रसंगावधान दाखवत मृतांना बाहेर काढून त्यांच्याजवळचे दागिने व रोख रक्कम प्रामाणिकपणे ताथवडे कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले.
अपघात झाल्यानंतर मदत करायची सोडून लुटालुटीचे प्रकार कित्येक ठिकाणी आपण पहातो आणि ऐकतो परंतु इंदापुरातील नितीन मामा खिलारे यांनी अपघात झालेवर कश्या प्रकारची मदत आणि कार्य केले पाहिजे याचे उत्तम उदाहरण समाजाला दाखवून दिलं आहे.नितीन मामा खिलारे यांनी प्रत्येक्ष जाऊन मदत तर केलीच परंतु आपल्या रुग्णवाहिकेला सजवून केदुर ता. पाबळ येथे जाऊन नातेवाईक यांच्या ताब्यात बॉडी स्वाधिनही केल्या.या कामासाठी त्यांना इंदापुरातील शिवसेना शहर प्रमुख मेजर महादेव सोमवंशी व सहकारी यांचीही मदत झाली.
या सर्व घटनेची इंदापूर तालुक्यात काल दिवसभर चर्चा चालू होती.नितीन मामा खिलारे हे गेली 3 वर्षांपासून खूप निष्ठेने व प्रामाणिकपणे आपला हा व्यावसाय चालवीत असून समाजात चांगल्या प्रकारे आपले नावलौकिक कमावले आहे.
या कामाची दखल घेऊन आज इंदापूर येथील विद्यानंद सहकारी बँकेत श्रीयश नलवडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी नितीन मामा खिलारे यांचा सत्कार केला.

