shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गुंडेगावची बंद असलेली अहमदनगर मुक्कामी बस सोमवार दिनांक०४/०१/२०२१ रोजी पुन्हा सुरू..!!


नगर। प्रतिनिधी-(शिवा म्हस्के):
कोरोना संकटामुळे कांही कालावधीसाठी खंडित झालेली गुंडेगाव एसटी बस सेवा पूर्ववत सुरू करण्यात आली आहे.सध्या ठरावीक बस सुरू करण्यात आल्या असून गुंडेगाव तसेच देऊळगाव, वाळकी, बाबुर्डी, येथील नागरिकांनी त्याचा लाभ घेण्याचे आवाहन एस टी महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

कोरोना काळात अनेक बाबींवर निर्बंध घालण्यात आले होते.त्यात ग्रामीण वाहतूक सुविधेचाही समावेश होता.कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना एसटी महामंडळाच्या वतीने शेतकरी तसेच व्यापारी यांच्या मालाचे ने-आण करण्यासाठी एसटी बस वाहतूक बससेवेचे रूपांतर मालवाहतूकमध्ये करण्यात आले होते.त्यामुळे प्रवासी वाहतूक बंद होती.ही वाहतूक आता पूर्ववत करण्यात येणार आहे.

परिवहन मंडळाच्या वतीने सध्या एकूण दोन किंवा दोन एसटी बस सुरू करण्यात आल्या आहेत.अहमदनगर, अरणगाव,वाळकी,देऊळगाव,गुंडेगाव,या मार्गावर दोन बस धावणार आहेत. 

एसटी बससेवेच्या माध्यमातून नागरिकांना कमी दरात प्रवास करता येतो.काही दिवस ही सेवा बंद होती. ती आता पूर्ववत सुरू करण्यात आली असून नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा,असे आवाहन राज्य परिवहन महामंडळ अहमदनगर चे. कल्हापुरे. साहेब, विभागीय वाहतूक अधिकारी श्री महाजन साहेब, वाहतूक पर्यवेक्षक नितीन गटणे,वतीने करण्यात आले आहे . तसेच जर या बसेस साठी प्रवासी नागरिक,महिला,नोकरदार, विद्यार्थी,विद्यार्थीनींनी,प्रतिसाद न दिल्यास पाच दिवसांनी एसटी बससेवा पुन्हा बंद करण्यात येईल अशा सूचना देण्यात आल्या आहेत .

त्याबद्दल राज्य परिवहन महामंडळ,तसेच सर्व दैनिक पत्रके,पत्रकार बंधू,  "शिर्डी एक्सप्रेस" ने सर्वात प्रथम बातमी प्रकाशित केली होती. यांचे गुंडेगाव ग्रामस्थांनी  आधार मानले या वेळी चालक वाहक जेष्ठ समाजसेवक राजाराम भापकर गुरुजी, विठ्ठल भापकर, दादासाहेब आगळे ,संजय भापकर, माउली कुताळ, भवानी प्रसाद चुंबळकर,नानासाहेब हराळ आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
close