shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब ह्या शिवरायांच्या आद्यगुरू.. माजी नगराध्यक्ष रत्नाकर मखरे..!!

राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब ह्या शिवरायांच्या आद्यगुरू.. माजी नगराध्यक्ष रत्नाकर मखरे..!!
इंदापूर/ प्रतिनिधी:- (१२ जाने.२१)राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब ह्या बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांच्या आद्य गुरू होत्या तसेच आदर्श माता देखील होत्या असे प्रतिपादन इंदापूर नगरीचे माजी नगराध्यक्ष व मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टचे  विद्यमान अध्यक्ष रत्नाकर मखरे यांनी आज (दि.१२) भिमाई आश्रमशाळा इंदापूर येथे बोलताना केले.
राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांची ४२३ वी जयंती मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट इंदापूरच्या वतीने भिमाई आश्रमशाळेत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. 
ते पुढे म्हणाले की, माता केवळ माया नसून शक्ती असू शकते. याचं सर्वात मोठं उदाहरण जिजाबाईचं असू शकतात. राजमाता जिजाऊ यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज घडवले. स्वराज्य संकल्पनेचे बी मातेनेच आपल्या शिवरायांच्या मनात पेरले  तुम्हाला स्वराज्य निर्माण करायचे आहे,असा प्रचंड आत्मविश्वास शिवरायांमध्ये निर्माण केला. तसेच शिवरायांना घडवत असताना जिजाऊंनी त्यांना राष्ट्रहितासाठीच तयार केले.
मखरे पुढे म्हणाले की,जिजाऊ माँसाहेब खरोखर आदर्श माता आहेत. आपल्या मुलांना धैर्य,परोपकार, आत्मविश्वास,शौर्य,न्याय,निर्भय व राष्ट्रप्रेम या सर्वांचे धडे देण्याचे व त्यांच्यात संस्कार देण्याचे सामर्थ्य प्रत्येक आईमध्ये असतं. प्रत्येक स्त्रीने आपली शक्ती ओळखून उज्वल भविष्य निर्मितीसाठी प्रयत्न केले पाहिजे. असे शेवटी मखरे यांनी म्हटले आहे. 
उपप्राचार्या सविता गोफणे मॅडम, मनीषा जगताप मॅडम, प्रा. झेंडे मॅडम यांनी जिजाऊ माँसाहेब यांच्या जीवनावर आपल्या मनोगतातून प्रकाश टाकला. सदर कार्यक्रमास संस्थेच्या ज्येष्ठ संचालिका शकुंतला मखरे, सामाजिक कार्यकर्ते गोरख तिकोटे, सचिव ॲड. समीर मखरे उपस्थित होते.
प्रास्ताविक भिमाई आश्रमशाळेचे मुख्याध्यापक साहेबराव पवार यांनी केले. सूत्रसंचालन नानासाहेब सानप यांनी केले.
सदर कार्यक्रम प्राचार्या अनिता साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
close