shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

खड्यांमुळे ट्रक चालकाला अंदाज न आल्याने गहूने भरलेला ट्रक शेतात पलटी...!!

संगमनेर। प्रतिनिधी(ऋषिकेश जगताप):
गव्हाचा ट्रक पलटी झाल्याची घटना शनिवारी ९ वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात ट्रक चालक सुदैवाने बचावला आहे. यामध्ये गहू व ट्रकचे मात्र मोठे नुकसान झाले आहे.

साकुर येथून सातारा या ठिकाणी गव्हाच्या गोण्या घेऊन जाणारा मालवाहू ट्रक (क्रमांक एम.एच. १२ सी.टी. ०१८८) शनिवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास साकुर फाटा येथे आला असता उप रस्त्यांवर पडलेल्या खड्यांमुळे चालकाला अंदाज न आल्याने ट्रक लगत असलेल्या चाळीस फुट खोल शेतात पलटी झाला. या अपघातात गव्हाच्या गोण्या फुटल्याने मोठे नुकसान झाले आहे. यात ट्रक चालक बचावला आहे.
close