shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अंतेश्वर ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध..!!

आमदार शामसुंदर शिंदे, सामाजिक  कार्यकर्त्या आशाताई शिंदे, बाळासाहेब पाटील कराळे यांच्या नेतृत्वावर ग्रामस्थांचा विश्वास..!

लोहा (प्रतिनिधी):
लोहा तालुक्यातील मौजे अंतेश्वर ग्रामपंचायतीची 2021 निवडणूक बिनविरोध पणे पार पडली आहे. लोहा मतदारसंघातील ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध काढण्याचे आवाहन लोहा,कंधार मतदार संघाचे आमदार शामसुंदर शिंदे व सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शामसुंदर शिंदे यांनी केले होते. त्यांच्या आवाहनाला अंतेश्वर ग्रामस्थांनी प्रचंड प्रमाणात प्रतिसाद दिला असून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व गावकऱ्यांनी शिवसेनेचे लोहा, कंधार चे नेते बाळासाहेब पाटील कऱ्हाळे, आमदार शामसुंदर शिंदे यांचे कट्टर समर्थक माजी सरपंच सतीश पाटील कराळे, संदीप पाटील कराळे यांच्या नेतृत्वाखाली अंतेश्वर ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध पणे पार पडली.
                    सतिश पाटील कराळे

यात एकूण सात जागा असून सातच उमेदवारांनी नामांकन पत्र दाखल केले आहेत ते पुढील प्रमाणे प्रभाग क्रमांक( 1). बोरुडे गंगासागर शंकर ( ब). संध्या ताई तुकाराम कराळ ,सदानंद दुर्गा या मठपती, प्रभाग क्रमांक 2.( अ) माधव फुलाजी कराळे( ब) वेणूताई गोपीनाथ कराळे ,प्रभाग क्रमांक 3(अ )पत्रे त्र्यंबकेश्वर( ब) कमलबाई दादाराव कराळे यांनी नामांकन पत्र दाखल केले आहेत. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. अशी माहिती अंतेश्वर चे माजी सरपंच सतीश पाटील कराळे यांनी दिली आहे.

यावेळी शंकर  बोरुळे ,माऊली पाटील जोगदंड,गणेश कराळे, प्रल्हाद पाटील,तुकाराम पाटील कराळे, भाऊराव करावे आदी उपस्थित होते, ग्रामपंचायत अंतेश्वर लोहा,कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष आमदार शामसुंदर शिंदे सामाजिक  कार्यकर्त्या आशाताई शिंदे व शिवसेना नेते बाळासाहेब कराळे यांच्या ताब्यात गेली आहे.
close