shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघाची जिल्हा कार्यकारिणी जाहीर ..!!


सांगली : कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघाची सांगली जिल्हा कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. जिल्हाध्यक्षपदी रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आष्टा ता वाळवा येथील ज्युनिअर कॉलेज विभागप्रमुख प्रा. दिलीप आनंदराव जाधव यांची व सचिवपदी प्रा.बाबासाहेब पाटील यांची निवड करण्यात आली आहे. 

महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघाचे अध्यक्ष प्रा.सुनील डिसले बारामती,राज्य सचिव प्रा बाळासाहेब माने मुंबई यांनी या निवडीबरोबरच जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली. उपाध्यक्ष सौ मेघा अलासे (सांगली), सहसचिव प्रा.विजयकुमार शिंदे(इस्लामपूर),
खजिनदार प्रा सुनील गवारी (सांगली) कार्यकारिणी सदस्य पदी प्रा. सुखदेव वाघ (शिराळा), प्रा. माणिक कोडग (जत), प्रा. सौ. अर्चना पाटील(कवलापूर) विशेष निमंत्रित मार्गदर्शक सदस्य प्रा. सौ. नीता पाटील (कडेगाव), याची निवड करण्यात आली असून या बरोबरच तालुकानिहाय प्रतिनिधींची निवड करण्यात आली. 

प्रा. श्रीकृष्ण पडळकर (आटपाडी ),प्रा. सौ. वैशाली महाडीक -पवार (खानापूर -विटा ),प्रा. गजानन पाटील (तासगाव), प्रा. धीरजकुमार पाटील (पलूस),प्रा. सौ. सीमा  सूर्यवंशी (कवठेमहांकाळ),प्रा. दादासाहेब जाधव (वाळवा),प्रा. सौ. भारती बाबर(कडेगाव), प्रा. विजयकुमार पाटील  (मिरज),प्रा. विठ्ठल  कुलकर्णी (जत)प्रा.भारत नलवडे (शिराळा)यांची निवड करण्यात आली आहे. 

 मराठी भाषा संवर्धनासाठी आम्ही एकमताने काम करणार आहोत असे  जिल्हाध्यक्ष  प्रा. दिलीप जाधव यांनी सांगितले.
close