नगर: महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघटनेची कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली असून पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नवगिरे, जिल्हा खजिनदार अन्सार शेख ,नगर शहराध्यक्ष भारत पवार यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली नगर तालुका ग्रामीण पत्रकार संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी दैनिक लोकमतचे प्रतिनिधि खासेराव साबळे यांची नियुक्ती करण्यात आली.
खासेराव साबळे
स॔घटनेच्या उपाध्यक्षपदी दैनिक पुढारीचे प्रतिनिधी शिवा म्हस्के सचिवपदी दैनिक प्रभातचे प्रतिनिधी रफिक शेख यांची निवड करण्यात आली. तर खजिनदारपदी नगर आसुडचे संपादक श्याम कांबळे यांची निवड तसेच संघटनेच्या कार्याध्यक्षपदी साबील सय्यद युथ आयकॉन न्युज २४ संपादक व संघटनेच्या सचिवपदी रियाज पठाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

शिवा म्हस्के
अन्सार शेख
यावेळी पञकार संघटनेचे रियाज शेख,अशोक तांबे, सागर कांबळे,संदीप कदम,आदि उपस्थित होते. यावेळी बोलताना साबळे म्हणाले की नगर तालुक्यातील ग्रामीण भागातील पत्रकारांना पुढे नेहमीच आव्हान ठाकलेली असतात ग्रामीण भागात पत्रकारिता करताना तेथील समस्यांना वाचा फोडताना पत्रकारांना अनेक समस्यांना द्यावे लागते येणाऱ्या पुढील काळात पत्रकारांच्या सोबत राहून त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी नेहमी तत्पर राहू असे मत व्यक्त केले.