shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पत्रकारांच्या स्व मालकीचे घर उभारणीचे स्वप्न साकार करणार ..अध्यक्ष हाजी एम. डी. शेख...!!

पत्रकारांच्या स्व मालकीचे घर उभारणीचे स्वप्न साकार करणार ..अध्यक्ष हाजी एम. डी. शेख...!!
इंदापूर : प्रतिनिधी (तात्याराम पवार)

केंद्र सरकार, राज्य सरकारच्या मदतीने पत्रकारांसाठी उभारण्यात येणाऱ्या गृहनिर्माणचे स्वप्न साकार करणार असल्याचे मत अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष हाजी एम डी शेख यांनी व्यक्त केले.

अखिल भारतीय भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न इंदापूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने हाजी एम डी शेख यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली जंक्शन (ता. इंदापूर) येथील कै.खंडू मोहोळकर शैक्षणिक संकुल येथे आयोजित करण्यात आलेल्या संघटनेच्या बैठकीत ते बोलत होते. 

या बैठकीकरता अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष डॉ.विकास शहा व कार्याध्यक्ष अतुल तेरखेडकर, जिल्हाध्यक्ष डॉ. संदेश शहा, जिल्हा निरीक्षक शौकत तांबोळी, पुणे जिल्हा संपर्कप्रमुख काकासाहेब मांढरे, तालुकाध्यक्ष राजेंद्र कवडे-देशमुख, शहराध्यक्ष सुरेश जकाते, सचिव धनंजय कळमकर, खजिनदार अंगद तावरे,  जेष्ठ पत्रकार शैलेश काटे उपस्थित होते. 

यावेळी पत्रकारांना संबोधित करताना राष्ट्रीय अध्यक्ष हाजी एम. डी. शेख म्हणाले की, तालुक्यातील पत्रकारांनी केवळ पत्रकार दिनादिवशी एकत्र न येता वर्षातील ३६४ दिवस  एकत्रित येऊन आपली शक्ती दाखवावी. आम्ही संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांना एकत्रित करण्यासाठी रात्रंदिवस काम करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात पत्रकारांसाठी गृहनिर्माण संस्था उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. इंदापूर तालुक्यातील पत्रकारांच्या गृहनिर्माण संस्थेकरिता स्व - मालकीची असणारी जागा उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे हाजी एम डी शेख यांनी कबूल केले.

पत्रकारांसाठी विमा संरक्षण तसेच पत्रकार क्षेत्राची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र अभ्यासक्रम तयार करुन इंदापूर येथे प्रशिक्षण संस्था उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष डॉ.विकास शहा व जिल्हाध्यक्ष डॉ. संदेश शहा यांनी पत्रकारांच्या समस्या, अडी-अडचणी, प्रश्न मांडले. 

या बैठकीस अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे सर्व सदस्य पत्रकार बांधव उपस्थित होते.

प्रास्ताविक शहराध्यक्ष सुरेश जकाते यांनी केले तर आभार तालुकाध्यक्ष राजेंद्र कवडे - देशमुख यांनी मानले. 


चौकट : कै. विठोबा भरणे यांना श्रद्धांजली... 

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे वडील कै. विठोबा भरणे यांचे नुकतेच निधन झाले आहे. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष हाजी एम डी शेख यांच्या अध्यक्षतेखाली शिष्टमंडळाने राज्यमंत्री भरणे यांच्या निवासस्थानी भेट घेवून भरणे कुटुंबांचे सांत्वन केले. संघटनेच्या सर्व पदाधिकारी, सदस्यांच्या वतीने कै. विठोबा भरणे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

====================================
close