shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पिंपरी चिंचवड भोसरीतील घटना प्रेमसंबंधाच्या कारणावरून मित्राचा कापला गळा..!!


पिंपरी चिंचवड:-प्रेमसंबंधाच्या कारणावरून एका मित्राने मित्राचा गळा कापला. ही घटना शुक्रवारी (दि. 1) सायंकाळी पावणे सात वाजता टेल्को रोड येथे घडली.


अभिषेक ऊर्फ आकाश मधूकर कांबळे (वय 26, रा. पावर हाऊस जवळ, बालाजीनगर झोपडपटटी, भोसरी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. याबाबत शुभम मधूकर कांबळे (वय 20, रा. पावर हाऊस जवळ, बालाजीनगर झोपडपटटी, भोसरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. किरण शिवाजी थोरात (वय 23, रा. बालाजीनगर झोपडपट्टी, भोसरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या वडिलांचे इंद्रायणी कॉर्नर भोसरी येथे लक्ष्मी ऑटो नावाचे गॅरेजचे दुकान आहे. जखमी अभिषेक हा रिक्षा चालवतो. शुक्रवारी सायंकाळी पावणे सात वाजताच्या सुमारास जखमी अभिषेक आणि त्याचा आरोपी मित्र किरण हे दोघेजण अभिषेक याच्या दुचाकीवरून (एम एच 12 / के एल 2270) इंद्रायणीनगर कडून बालाजीनगरकडे जात होते. त्यावेळी प्रेमसंबंधाच्या कारणावरून किरण याने अभिषेकचा गळा कापला. यामध्ये अभिषेक गंभीर जखमी झाला.

याबाबत किरण याच्या विरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी किरण याला अटक केली आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.
close