shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

'शिर्डी एक्सप्रेस" चा दणका..''आंदोलन यशस्वी' महापालिकेच्या ठेकेदारांचे उपोषण चौथ्यादिवशी आश्‍वासनानंतर मागे..!



नगर । प्रतिनिधी(शिवा म्हस्के):
"शिर्डी एक्स्प्रेस" ने आंदोलन सुरू झाल्या पासून वेळो वेळी बातमीच्या माध्यमातून दखल घेतली होती.त्यानंतर हे आंदोलन चार दिवस चालले.चौथ्या दिवशी संध्याकाळी आंदोलनास यश आले. कोरोनाच्या संकटानंतर आर्थिक परिस्थिती खालावल्याने महापालिकेत अनेक वर्षापासून थकित असलेल्या छोट्या कामाच्या बीलांची देयके मिळण्यासाठी ठेकेदारांचे महापालिकेसमोर उपोषण सुरु होते.उपोषणकर्त्यांनी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांची भेट घेतली असता छोटी कामे करणार्‍या ठेकेदारांवर अन्याय होऊ देणार नसल्याचे स्पष्ट करुन देयके देण्यासाठी सकारात्मक भूमिका दर्शविल्याने महापालिके समोर सुरु असलेले उपोषण चौथ्या दिवशी गुरुवारी (दि.28 जानेवारी) संध्याकाळी मागे घेण्यात आले.  
  
ठेकेदारांनी महापालिके समोर सोमवार दि.25 जानेवारी पासून उपोषण सुरु केले होते. थकित देयके मिळत नाही तो पर्यंत उपोषण चालू ठेवण्याचा निर्णय ठेकेदारांनी घेतला होता. बुधवारी काही उपोषणकर्त्यांची प्रकृती देखील खालावल्याने महापालिका प्रशासनाने आंदोलनाची योग्य दखल घेत सदर प्रश्‍न सोडविण्यास सहमती दर्शवली. मनपाचे मुख्य लेखा परिक्षक प्रविण मानकर यांनी उपोषणकर्त्यांना लिंबू पाणी देऊन त्यांचे उपोषण सोडवले.

या उपोषणात एस.बी. भोर, शहानवाज शेख, अमृत नागुल, विजय समलेटी, अमृत वन्नम, जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने प्रकाश पोटे, आकिज सय्यद, सर्फराज सय्यद, संजय डुकरे, नवेद शेख आदी सहभागी झाले होते.
महानगरपालिकेकडे महापालिकेच्या विविध लेखक शीर्षकांतर्गत शेकडो देयके अनेक वर्षापासून अदा करण्यासाठी प्रलंबित आहेत. त्या मोठ्या रकमेच्या देयकांची रेग्युलर आणि थकीत अशी दोन ज्येष्ठता याद्या आहेत. यातील देयके ज्येष्ठता यादीनुसार अदा केले जात होते.
तसेच दोन-तीन वर्षापासून नगरसेवक "स्वेच्छा निधी" या लेखाशिर्षका खालील देयके क्रमवारी प्रमाणे वर्षातून सर्व देयके अदा करून संपवली जातात.

 परंतु 50 हजार पेक्षा कमी रकमेची देयके जेष्ठता यादी केलेली आहे. परंतु ही छोटी देयके अदा करण्यात आलेली नाहीत. अशी छोटी कामे आपत्तीजनक व अत्यावश्यक परिस्थितीत स्थानिक अडचण निवारण करण्यासाठी करून घेण्यात आलेली आहेत. अशी कामे करणारे ठेकेदार हे साधारण परिस्थितीतले आहेत. त्यातच सन 2020 हे कोरोना या संसर्गजन्य रोगाच्या प्रादुर्भावात गेले. यामुळे सर्वांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट बनली आहे. ठेकेदारांना कोणत्याही प्रकारचे उत्पन्नाचे साधन उरलेले नसल्याने सदर देयके मिळण्यासाठी ठेकेदारांनी उपोषण केले होते. 

या ठेकेरांच्या मागण्या मार्गी लागण्यासाठी आमदार संग्राम जगताप व नगरसेवकांनी देखील महापालिका प्रशासनाशी पाठपुरावा केला. तसेच या आंदोलनास पाठिंबा देणारे राजकीय पक्षाचे पदाधिकारी, विविध संघटनांचे,पदाधिकारी यांचे ठेकेदारांच्या वतीने आभार मानण्यात आले आहे.
close