shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राहाता तालुक्यातील सावळीविहीर खुर्द ग्रामपंचायत बिनविरोध..!!

राहाता तालुक्यातील सावळीविहीर खुर्द ग्रामपंचायत बिनविरोध!

सावळीविहीर ( प्रतिनिधी)
 राहाता तालुक्यातील सावळीविहीर खुर्द येथील ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करण्यात आली असून दोन्ही गटाची सहमती एक्सप्रेस  विकासाच्या रुळावर येथे पहिल्यांदाच मोठ्या उत्साहात धावली आहे,
 सावळविहीर खुर्द या  गावाची निवडणूक 15 जानेवारी रोजी होणार होती, मात्र काल माघारीच्या दिवशी अनेक उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतल्यामुळे व 11 उमेदवारांचे अर्ज राहिल्यामुळे ही बिनविरोध निवडणूक झाली आहे, बिनविरोध निवडून आलेल्या सावळीविहीर खुर्द ग्रामपंचायती  मध्ये 11 सदस्य असून त्यामध्ये सहा पुरुष व पाच महिला सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत, 
त्यामध्ये अशोकराव श्रीपत जमधडे, शरद भाऊसाहेब भदे, महेश भास्कर जमधडे, रवींद्र पंडित, सूर्यभान माळी, बबन अहिरे, त्याचप्रमाणे अर्चना दत्तात्रय शिरसागर, सपना सुधीर वर्पे, रेखा रमेश पवार, महिमा साईनाथ झिझांड, सुजाता महेश जमधडे हे सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत, या सर्व बिनविरोध निवडून आलेल्या सर्व नूतन सदस्यांचे  अभिनंदन होत आहे, साळवविहीर खुर्द ग्रामपंचायतीची बिनविरोध निवडणूक करण्यासाठी दोन्ही गटाचे भास्करराव जमधडे, किसनराव शिरसागर , शिवाजी बाबुराव वर्पे, भिमा निवृत्ती वर्पे, अशोकराव जमधडे, शरद भदे ,साईनाथ गुंजाळ, महेश जमधडे, आदींनी प्रयत्न केले व ही समझोता एक्सप्रेस विकासाचा रुळावर धावली गेली, दोन्ही गटाचा समझोता होऊन ही निवडणूक बिनविरोध झाल्यामुळे सावळी खुर्द येथील गटतट जाऊन येथे विकासाला नवी दिशा मिळाली आहे व सावळीविहीर खुर्द ग्रामपंचायतीचा आदर्श यापुढे होणाऱ्या ग्रामपंचायतीने घ्यावा असी आता परिसरातही नागरिकांची मागणी होत आहे,
close