shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नवापूर सिमा वाहन तपासणी नाक्यावर रस्ता सुरक्षा अभियान..!


नवापूर (सैफूल्लाहखान ) - रस्त्यावरील अपघात कमी व्हावे,वाहन चालकांना वाहूतूकीचे योग्य नियम कळावे तथा अपघातसमयी तात्काळ कोणकोणती काळजी घेण्यात यावी याकरीता केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून पोलिस खाते, प्रादेशिक (आरटीओ)परिवहन खाते आणि सार्वजनिक बांधकाम खाते यांच्या संयुक्त विद्यमाने तथा आरोग्य विभाग, सामाजिक संस्था/ संघटना,वाहन चालक/मालक संघटना,वाहन शोरुम्स, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार यांच्या विशेष सहभागातून दरवर्षी जानेवारी महिन्यात रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात येतो.

यामध्ये वाहन चालकांची विनामूल्य आरोग्य तपासणी, नेत्र,शुगर तपासणी याबरोबरच रक्तदान शिबीरे,वाहतूक नियम प्रबोधनपर शिबिरे, वाहतूक नियमांचे पत्रके वाटणे,वाहनांना रिफ्लेक्टर लावणे,वाहतूक नियमांविषयी जनजागृती करणे आशा विविध प्रकारचे जनकल्याणकारी उपक्रम राबविले जातात.

यावर्षी मात्र हा केवळ सात दिवसांचा रस्ता सुरक्षा सप्ताह नसून "रस्ता सुरक्षा-जिवन रक्षा" या श्लोगनाखाली दिनांक १८ जानेवारी ते १७ फेब्रूवारी असा तब्बल एक महिन्याचा प्रथमच "३२ वा राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान"राबविला जात आहे.या निमित्ताने नवापूर सिमा वाहन तपासणी नाक्यावर ३२ वा राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान विविध उपक्रम राबवून साजरा केला जात आहे.

नवापूर सिमा तपासणी नाक्यावर वाहन चालक/मालकांना रस्ता सुरक्षे विषयक माहिती देऊन त्यांचे प्रबोधन करण्यात येत आहे, वाहनांना रिफ्लेक्टर लावून वाहन चालक/मालकांना रस्ता सुरक्षा विषयक माहिती पुस्तकेचे वाटप करण्यात येत आहे,यासोबतच वाहन चालकांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचेही आयोजन करण्यात आलेले आहे.

वरीष्ठ मोटार वाहन निरीक्षक तुषार मिस्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली मोटार वाहन निरीक्षक जमीर तडवी,पी.जी.पाटील,मनिष दौंड,धनंजय देवकर,सादिक चाबुकस्वार, महेश देशमुख आदी परीश्रम घेत आहेत,
वाहन चालकांसमवेत विद्यार्थी/विद्यार्थिनी तथा सर्वसामान्य नागरीकांनी या रस्ता सुरक्षा अभियानात आवर्जून आपला सहभाग नोंदवावा असे अवाहनही आरटीओ अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.
close