सावळीविहीर( प्रतिनिधी):
अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या राहाता तालुक्यातील या बँकेचे विद्यमान संचालक व माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पा. व शेवगाव येथून चंद्रशेखर घुले यांचा आज एकमेव अर्ज असल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे.
त्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक 20 फेब्रुवारी रोजी असून आज सोमवार दिनांक 25 जानेवारी रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत संचालक मंडळासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत होती ,या मुदतीपर्यंत राहाता तालुक्यातून विद्यमान संचालक व माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता.
तसेच शेवगाव मधून सोसायटी मतदारसंघातून चंद्रशेखर घुले यांचा एकमेव अर्ज असल्याने व या बँकेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज दुपारी तीन वाजता मुदत संपल्यानंतर अण्णासाहेब म्हस्के पा. व शेवगाव चे चंद्रशेखर घुले यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची अहमदनगर जिल्हा बँकेवर संचालक म्हणून बिनविरोध निवड झाली आहे.
अण्णासाहेब म्हस्के पा.हे सध्या जिल्हा बँकेवर विद्यमान संचालक आहेत. त्याचप्रमाणे माजी मंत्री आहेत.माजी विरोधी पक्षनेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील व खासदार डॉक्टर सुजय विखे यांच्या मार्गदर्शनाखाली अण्णासाहेब म्हस्के पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे.
जिल्हा बँकेवर निवड होणारे ते पहिले संचालक आहेत. त्यांचे संचालक पदी निवड झाल्याबद्दल आमदार राधाकृष्ण विखे पाटील, डॉ. खासदार सुजय विखे पाटील व राहाता तालुक्यातून सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

