कायद्याचे पालन करणे काळाची गरज-न्यायमूर्ती दिनकरराव अरगडे
लोहा:( प्रतिनिधी) :
घटनेने सर्व स्तरातील नागरिकांना अधिकार दिले असून सर्वांनी जीवनात कार्य करत असतांना कायदा हातात घेऊ नयेसर्वांनी कायद्याचे पालन करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन लोहा न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दिनकरराव अरगडे यांनी लोहा येथे आयोजित कार्यक्रमात केले.
जि.प.शाळा लोहा येथे आज प्रजासत्ताक दिनी, मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर न्यायाधीश प्रशांत तौर, न्यायाधीश पद्माकर धोंडगे, अभियोक्ता संघाचे अध्यक्ष ॲड एसबी कांबळे, लोहा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भागवत जायभाये, न्यायालयाचे सहाय्यक अधिक्षक श्री मोरे, वसंत वडजे पाटील कर्मचारी (विधी.सेवा.प्राधिकरण.), विधी सेवा प्राधिकरणचे सदस्य तथा स्वयंसेवक विलास वडजे, श्यामअण्णा पवार, भीमराव जोंधळे, राजीव तिडके,मंगल सोनकांबळे, आदीसह उपस्थित होते.
पुढे बोलताना लोहा न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अरगडे म्हणाली की राज्यघटनेचा अभ्यास सर्वांना असणे गरजेचे आहे कायदा हा सर्वश्रेष्ठ असून कायद्याचे सर्वांनी पालन करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. भविष्यात जीवन जगत असताना विद्यार्थ्यांनी चांगल्या गोष्टीचे आचरण करावे व वाईट गोष्टीला दूर ठेवावे असे सांगून त्यांनी तरुणांनी व्यसनापासून दूर राहावे असे आवाहनही केले. मराठी व इंग्रजी भाषा यांना समान दर्जा देऊन मराठी भाषेचा विकास करावा असे नमूद केले. नागरिकांनी कायदा समजून घेऊन कायद्याचे पालन करणे काळाची गरज आहे असे प्रतिपादन लोहा न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अरगुडे यांनी केले. न्यायाधीश प्रशांत तौर,न्यायाधीश पद्माकर धोंडगे यांनी मराठी संवर्धन पंधरवडा कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमात सोशल मीडिया "शाप की वरदान" या विषयावर विद्यार्थ्यांची वाद विवाद स्पर्धा संपन्न झाली.यावेळी नगरसेवक पंचशील कांबळे, शा.व्य.समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर भिसे, प्रभारी मुख्याधिपिका सौ.प्रेमलाताई नरंगले,श्री.मुंढे, गुंडरे,छाया बैस,सौ.केंद्रे,फारूक शेख, सोनटक्के सर लिपीक अनंतवार ,विद्यार्थी, वकिल आदी उप
सूत्रसंचालन अँड.बि.एम.गोरे यांनी तर आभार प्रदर्शन राजीव तिडके यांनी केले.

