पिंपरी चिंचवड:- सरस्वती भुवन इंग्लिश मिडियम स्कूल पिंपळे गुरव येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका माया बायस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचे सर्व नियम पाळून तसेच फिजिकल डिस्टन्सिंग पाळत ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शाळेच्या शिक्षिका वैशाली दीनदल, सीमा कांबळे, सुचित्रा भोसले, शिक्षक अनिल लोखंडे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे शिक्षक सुनील साठे यांनी केले. कार्यक्रम शिस्तबद्ध तसेच यशस्वीरीत्या पार पडल्याबद्दल शाळेच्या संस्थापिका जागृती धर्माधिकारी यांनी सर्वांचे कौतुक केले व सर्वांचे आभार मानले.

