shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

हर्षवर्धन पाटील यांच्या सोमवारी इंदापूर तालुक्यात राम मंदीर निर्माण कार्यासाठी ६ बैठका..!!

हर्षवर्धन पाटील यांच्या सोमवारी इंदापूर तालुक्यात राम मंदीर निर्माण कार्यासाठी  ६बैठका..!!
 
इंदापूर:प्रतिनिधी (दि.२५ जाने.२१)
            राष्ट्रीय अस्मितेचे प्रतीक असलेल्या आयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माण कार्यासाठी जनतेकडून निधी संकलनाचे कार्य सध्या देशात व राज्यात गावागावात उत्साहात सुरु आहे.या कार्यास गती यावी या उद्देशाने माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या सोमवारी (दि.२५)  इंदापूर तालुक्यामध्ये ६ ठिकाणी बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे.
         बैठका होणारी मध्यवर्ती गावे व ठिकाणे पुढील प्रमाणे:- भिगवण- सकाळी ९वा. ( विठ्ठल रुक्मिणी मंगल कार्यालय), सणसर- सकाळी १०.३० वा. ( महादेव मंदिर), जंक्शन-दुपारी १२ वा. (मयुर मंगल कार्यालय), बावडा- दुपारी ३ वा.  (विठ्ठल-रुक्मिणी मंदिर), इंदापूर-दुपारी ४.३० वा. (श्रीराम मंदिर रामवेस नाका ) आणि निमगाव केतकी सायंकाळी ६ वा. (संत सावता माळी मंगल कार्यालय).
       या ऐतिहासिक निर्माण कार्यात आपला खारीचा वाटा उचलून प्रत्येकाने सहभागी होणे हे अपरिमित समाधान देणारे कार्य आहे. तरी या बैठकांना संबंधित गटातील कार्यकर्त्यांनी व सर्वधर्मीय नागरिकांनी उपस्थित राहावे,असे आवाहन करण्यात आले आहे.
close