युवकांच्या गळ्यातील ताईत बनले राजवर्धन पाटील..!!
राजवर्धन पाटील यांनी केले सरस्वतीनगर येथे सागर अरगडे आयोजित भव्य टेनिस बॉल हाफपिच क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन.
राजवर्धन पाटील यांनी फलंदाजी करत केले उद्घाटन
इंदापूर प्रतिनिधी: (२४ जाने.२१)इंदापूरचा ऐतिहासिक भूमीत जन्मलेले माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे सुपुत्र युवकांच्या गळ्यातील ताईत बनत यांचे संवेदनशील नेतृत्व बनले आहेत
निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांनी आज रविवार (दि.२४ जाने ) यांच्या उपस्थितीत सरस्वतीनगर येथे सागर अरगडे आयोजित भव्य टेनिस बॉल हाफपिच क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन समारंभ संपन्न झाला.
या स्पर्धाचे आयोजन फिरोज भाई शेख मित्रपरिवार इंदापूर ,प्रशांत मामा उंबरे युवामंच इंदापूर, एच के ग्रुप, शिवज्योत मित्र मंडळ सरस्वतीनगर, श्रीनाथ मित्र मंडळ सरस्वतीनगर, इम्रान भाई फ्रेंड सर्कल इंदापूर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. असून, क्रिकेट प्रेमी व खेळाडूंसाठी हापपिच षटकार असणारी ही क्रिकेट स्पर्धा अनेकांना निख्खळ आनंद देणारी असेल.
या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक व चषक फिरोजभाई फ्रेंड सौजन्य सर्कल इंदापूर .द्वितीय पारितोषिक व चषक सागर सुनील अरगडे मित्रपरिवार इंदापूर. तृतीय पारितोषिक व चषक संदीप (बापू) चव्हाण इंदापूर आणि चतुर्थ पारितोषिक व चषक अख्तर कुरेशी एच के ग्रुप इंदापूर यांच्या माध्यमातून देण्यात आले असून,
काही वैयक्तिक आकर्षक बक्षिसेही या सामन्यांसाठी पुढील प्रमाणे मान्यवरांनी ठेवली आहेत.
१. मॅन ऑफ दि मॅच -इम्रान भाई शेख शहराध्यक्ष यु.रा. कॉ. ,२. मॅन ऑफ दि सिरीज- प्रशांत (मामा) उंबरे युवा मंच, ३. ३ बॉल ३ विकेट- बंडा पाटील (युवा नेते) ,४. ६ बॉल ६ षटकार -.अतुल शेटे पाटील ,५.४ बॉल ४ चौकार-संदीप चव्हाण,६. उत्कृष्ट यष्टीरक्षक- ललेंद्र शिंदे मित्र परिवार,७. जलद अर्ध चषक-अलताफ काझी ,८. सर्वाधिक षटकार-अमीरभाई बागवान,९. उत्कृष्ट झेल-रविकिरण क्षीरसागर १०. निर्धाव षटक- वैभव बारबोले,११. उत्कृष्ट पंच -हॉटेल तेजस गार्डन ,१२. उत्कृष्ट शिस्तबद्ध संघ- विवेकभाऊ चौगुले तसेच बॉल पै. महादेव (नाना) व्यवहारे यांच्या माध्यमातून झाले आहे. त्यामुळे सामने अत्यंत चुरशीचे आणि स्पर्धात्मक होतील.
यासाठी विशेष सहकार्य अजिंक्य सुरेश जावीर व सागर सुनिल अरगडे यांनी केले असून आयोजक फिरोज भाई शेख, संतोष काळे ,वैभव बारबोले व इतर आयोजकांनी या सामन्यांसाठी विशेष परिश्रम घेतले असून त्यांचे यावेळी जनसामान्यांचे नेतृत्व राजवर्धन पाटील यांनी कौतुक करत सामने यशस्वी व खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडण्यासाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या व बक्षीस दिलेल्या संस्थाचे व प्रतिष्ठित मंडळीचे यावेळी मनःपूर्वक आभार मानले.

