विद्याधर साळवे । राजगुरूनगर प्रतिनिधी , दि.२४-०१-२०२१.
राजगुरुनगर येथे नेताजी सुभाष चंद्र बोस प्रतिष्ठान आणि जागर पथारी संघटनेच्या वतीने एसटी बस स्थानकावर असलेल्या हुतात्मा स्मृती शिल्प स्थळावर नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली.
या अभिवादन कार्यक्रम प्रसंगी आमदार दिलीप मोहिते पाटील , जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, जिल्हा नियोजन समिती सदस्य कैलासराव सांडभोर पाटील , माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण चांभारे, जागर संघटनेचे अध्यक्ष सुरेश भाऊ भोर , हिरामण सातकर , पोलिस निरीक्षक सतीश गुरव, शांताराम चव्हाण, रवींद्र गुजराथी, माधवराव संभुस , बाळासाहेब सांडभोर, प्रदीप कासवा, खेड तालुका ग्राहक हक्क समितीचे अध्यक्ष रंगनाथ सुतार आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या नागरिकांना मास्क व खाऊचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन प्रतिष्ठानचे अध्यक्ष अशोक दुगड, किसन लोणकर ,सुरेश पालीवाल, शिवाजी वाघमारे, पाराजी हांडे, भूषण दुगड, संतोष गाडेकर , मयुर होले , चंद्रकांत साबळे आदींनी केले.
--------------------------------------------------------------------------------

