(केज येथे संक्रातीचे अनोखे वाण)
केज । जिल्हा प्रतिनिधी प्रकाश मुंडे :-
केज शहरातील तीन मैत्रिणींनी सौ रेणुका पुरुषोत्तम सत्वधर , सौ कविता सचिन रोडे, सौ शीतल उपेंद्र शिंदे यांनी संक्रांतीच्या निमित्ताने हळदी-कुंकू कार्यक्रमात174 महिलांना विमा कवचाचे चे वाण दिले.
महिलांना अपघात विमा कवच देण्यासाठी तिघी मैत्रिणी पुढाकार घेत हा स्तुत्य उपक्रम राबवला.
कुंकवाचा कार्यक्रनिमित श्रीराम मंदिर केज येथे 175 महिलांना मोफत अपघाती विमा देऊन नवीन प्रकारचे वाण स्तुत्य उपक्रम राबवला.
महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या स्तुत्य उपक्रमाबद्दल महिलांनी मैत्रिणी बद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमास सौ शीतल ताई पशुपतीनाथ दांगट यांची प्रमुख उपस्थिती होती . यांच्या हस्ते महिलांना विमा कवच प्रदान करून विमा पावती देण्यात आल्या.
शहरातील या अनोख्या उपक्रमामुळे आतापर्यंत यांना विमा कवच मिळाले नव्हते त्या सर्व महिलांनी समाधान व्यक्त केले आहे.

