shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अंकिता पाटील यांच्या हस्ते रंजना चव्हाण यांचा सत्कार..!!

अंकिता पाटील यांच्या हस्ते रंजना चव्हाण यांचा सत्कार..!!
  इंदापूर प्रतिनिधी:-
 जिल्हा परिषद सदस्या अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी आज लाखेवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल रंजना शिवाजी चव्हाण यांचा सत्कार केला आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
  लाखेवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी रंजना शिवाजी चव्हाण यांची नुकतीच निवड झाली असून आज त्यांच्या निवासस्थानी जाऊन अंकिता पाटील यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
   सर्व क्षेत्रात  आज महिला  पुढे येत असून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शासकीय योजनेचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत मिळण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन यावेळी अंकिता पाटील यांनी केले.
close