प्रतिनिधी । मोहन शेगर,
सोनई: शेवागांवच्या एल.आय.सी कार्यालयात सावळा गोंधळ सुरू असून एल.आय.सी पॉलिसी ची मुदत संपून सुद्धा पॉलिसी धारकाला दोन महिन्या पासून पेमेंट मिळाले नाही.
या बाबत समजलेली अधिक माहिती अशी की, पॉलिसी क्रमांक ९५२३८५४८१ ची मुदत ११/१०/२०२० रोजी संपली होती होती. पॉलिसी धारकाने पॉलिसी चे पेमेंट मिळण्यासाठी लागणारे सर्व आवश्यक कागदपत्रे एजंट मार्फत शेवगांव कार्यालयात जमा केली परंतु शेवगाव कार्यालयाकडून ज्या पॉलिसी धाराकाला पेमेंट वर्ग होणे गरजेचे होते त्याला न होता दुसऱ्याच व्यक्तीच्या खात्यात जमा झाली. मात्र पॉलिसी धाराकाने शेवगाव ऑफिस बरोबर संपर्क साधला असता सदर झालेला प्रकार उघडकीस आला.
प्रकरणाची पूर्ण चौकशी झाल्यानंतर समजले की सदर पैसे शेवगाव जवळील मुंगी येथील एका महिलेच्या खात्यावर कार्यालयीन चुकीमुळे जमा झाले होते परंतु त्या महिलेने खात्यावरील पैसे काढून घेतले. सदर महिला जेव्हा पैसे भरेल तेव्हा तुमचे पैसे मिळतील असे उडवा उडविचे उत्तरे शेवगाव ऑफिस चे अधिकारी पॉलिसी धारक यांना देत आहेत. न्याय मिळावा म्हणून पॉलिसी धारक यांनी एल.आय.सी ऑफिस पुणे येथे ईमेल द्वारे संपर्क साधला परंतु त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचे प्रत्युत्तर आले नाही असे समजते.
या संपूर्ण प्रकारास शेवगाव ऑफिस चे अधिकारी जबाबदार असून विनाकारण ग्राहकाच्या डोक्याला त्रास होत आहे. एल आय सी ने अशा गोष्टींकडे लक्ष देऊन ग्राहांकाची अवहेलना थांबावी अशी मागणी ग्राहकांकडून होत असताना दिसते आहे. लवकरात लवकर न्याय न मिळाल्यास सदर पॉलिसी धारक ग्राहक मंचाकडे धाव घेणार असल्याचे समजते.

