नांदेड (प्रतिनिधी):
नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय, कृषी विभाग नांदेड,जिल्हा परिषदेच्या संयुक्त विद्यमानाने भव्य कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते, शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालाला थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ची अभिनव कल्पना जिल्हा प्रशासनाने राबवली आहे.
या कृषी महोत्सवाला आज सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शामसुंदर शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या प्रत्येक स्टॉलला भेट देऊन प्रत्येक गोष्टीची माहिती घेऊन पाहणी केली व शेतकऱ्यांची निराशा दूर होण्यासाठी आशाताई शिंदे यांनी उपस्थित सर्व कृषी स्टॉलच्या स्टॉलला भेट देऊन शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले.
यावेळी आशाताईंनी विक्रीसाठी आलेल्या प्रत्येक वस्तूची पाहणी करून शेतकऱ्यांच्या प्रत्येक वस्तू स्वतः खरेदी करून शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले. यावेळी कृषी अधीक्षक रविशंकर चलवदे, तालुका कृषी अधिकारी रमेश देशमुख, विश्वनाथ पा. लोंढे ,शिवराज पाटील शिंदे, कंधार बाजार समिती संचालक अनिकेत पाटील जोमेगावकर, तानाजी पाटील,कृषी सहायक राजू कदम, बसवेश्वर मडके, यांच्यासह कृषी अधिकारी, कर्मचारी, शेतकरी, विक्रेते ,ग्राहक ,पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

