प्रतिनिधी। मोहन शेगर :
सोनई- संपुर्ण नेवासा तालुक्यातचे लक्ष लागुन असलेल्या सोनई ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली अर्थ व पशुसंवर्धन सभापती सुनिल गडाख व युवानेते उदयन गडाख यांच्या नेतृत्वाखालील जगदंबा ग्रामविकास मंडळाने सतरा पैकी सोळा जागा जिंकून ग्रामपंचायतीवर शिवसेनचा भगवा फडकवला आहे. माजी खासदार तुकाराम पाटील गडाख यांच्या मार्गदर्शनाखालील प्रकाश शेटे गटाला अवघी एक जागा मिळाली आहे.
विजयी पुढील प्रमाणे-
प्रभाग-१ मध्ये नवनाथ गोपीनाथ दरंदले, श्वेताली कृष्णा दरंदले, सवित्रा बापू ओहळ, प्रभाग 2 धनंजय सखाराम वाघ, सुरेखा सचिन पवार, जयश्री सुनिल तागड ,प्रभाग-3 किशोर अशोक वैरागर, सविता अंबादास राऊत,प्रभाग-4 प्रसाद बाळकृष्ण हारकाळे, इप्तेसाम जमशेद सय्यद,शोभा प्रकाश शेटे,प्रभाग 5 भानुदास चिमा कुसळकर, मच्छिंद्र पिराजी कुसळकर, विद्या नितीन दरंदले,प्रभाग-6 राजेंद्र भिमराज बोरुडे, प्रभाकर बबन गडाख, अलका सखाराम राशिनकर तर माजी खासदार तुकाराम गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाश शेटे यांच्या सोनई ग्रामविकास पॅनेलच्या एकमेव शोभाताई प्रकाश शेटे या प्रभाग चार मधुन विजयी झाल्या आहेत.तसेच प्रभाग एक,दोन,तीन,चार,पाच मध्ये काही जागावर अटीतटीच्या लढती झाल्या.काही उमेदवार कमी अधिक फरकाने पराभुत झाले.
"सोनई ग्रामपंचायत निवडणुकीत आमच्या सोनई ग्रामविकास पॅनेलला जनतेने चांगले मतदान दिले. काही जागा खुप कमी मताच्या फरकाने गेल्या असल्या तरी धनशक्तीपुढे जनशक्तीची साथ आम्हाला भेटली आहे. यापुढे आम्ही विरोध जिवंत ठेवणार असुन तालुक्यात प्रत्येक निवडणुका लढवणार आहोत. या निवडणुकीत आम्ही सत्ताधार्यांपुढे यंत्रणेने मागे पडलो परंतु येथुन पुढे सत्ताधारी मंडळाच्या कारभारावर अंकुश ठेवण्यासाठी आम्ही काम करणार आहोत.
माजी खा.तुकाराम पाटील गडाख.मार्गदर्शक सोनई ग्रामविकास मंडळ.

