सावळीविहीर (प्रतिनिधी):
महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोणा मुळे सन 2020ते20 21 या शैक्षणिक वर्षात शाळा महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती. मात्र कोरोणाचा प्रादुर्भाव राज्यात कमी झाल्यामुळे व आरोग्य विभागाची मान्यता मिळाल्यामुळे इयत्ता नववी ते बारावी पर्यंतचे वर्ग 23 नोव्हेंबर पासून राज्यांमध्ये सुरक्षितपणे सुरू करण्यात आले असून ते आता व्यवस्थितपणे सुरू झाले आहेत.त्याचप्रमाणे आता इयत्ता पाचवी ते आठवी चे वर्ग 27 जानेवारी 20 21 पासून सुरु करण्यास शासनाने परवानगी दिली असून 27 जानेवारीपासून आता पाचवी ते आठवी पर्यंत चे वर्ग सुरू होणार आहेत.
यासंदर्भात महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांनी 18 जानेवारी रोजी एक परिपत्रक प्रसिद्ध केले असून या परिपत्रकात म्हटले आहे की, कोरोणा चा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून महाराष्ट्रात शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती.मात्र कोरोणाचा प्रादुर्भाव कमी होत असून शासनाच्या आरोग्य विभागाने त्यास संमती दिल्याने इयत्ता नववी ते बारावी पर्यंतचे वर्ग 23 नोव्हेंबर 20 20 पासून महाराष्ट्रात सुरू झाले आहे.
टप्प्याटप्प्याने विद्यार्थ्यांची संख्या आता वाढत आहे. सुरक्षितपणे हे वर्ग सुरू झाले असून विद्यार्थ्यांचे शालेय नुकसान होऊ नये तसेच विद्यार्थी व पालकांनी त्याचा त्रास होऊ नये म्हणून आता इयत्ता पाचवी ते आठवी पर्यंतचे वर्गही सुरू करण्यास आरोग्य विभागाने संमती दिली आहे. त्यामुळे कोरोणाच्या शासनाने दिलेल्या अटी व शर्ती राखत संबंधित शिक्षण संस्थेने येत्या 27 जानेवारी 20 21 पासून इयत्ता पाचवी ते आठवी पर्यंत चे वर्ग टप्प्याटप्प्याने सुरू करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे आता इयत्ता पाचवी ते आठवी पर्यंत वर्ग 27 जानेवारीपासून सुरळीतपणे व सुरक्षितपणे सुरू होतील.
मात्र हे वर्ग सुरू होताना ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका येथील सर्व शाळा, महाविद्यालये व शैक्षणिक संस्थांनी कोरोणा संदर्भातल्या शासनाने दिलेल्या सर्व अटी व शर्तींचे पालन करणे महत्त्वाचे आहे. असेही या परिपत्रकात म्हटले आहे.

