shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

धक्कादायक.! पाण्यात बुडून दोन सख्या भावांसह मामाचाही मृत्यू..!!


शिर्डी प्रतिनिधी :
कु.किरण जाधव

संगमनेर- केटीवेअरच्या पाण्यात दोन सख्या भावांचे व त्याच्या मामाचाही बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दरम्यान हि घटना संगमनेर तालुक्यातील झोळे येथे गणेशवाडी येथे घडली असल्याचे समजते आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, सुरज संतोष गाढवे (वय १५) व मयूर संतोष गाढवे (वय १३) हे दोघे भाऊ आपले सख्खे मामा संजय भाऊसाहेब खर्डे (वय ४० रा. गणेशवाडी झोळे) यांच्याकडे आले होते.

त्यावेळी मयूर व सुरज यांना पाण्याचा अंदाज न आल्याने हे दोघे भाऊ पाण्यात गटांगळ्या खाऊ लागले. हे पाहून मामा दोन्ही भाच्यांना वाचविण्यासाठी गेले असता मामा व भाच्यांना पोहता येत नसल्याने तिघांचाही पाण्यात मृत्यू झाला.त्यानंतर तिघांचे मृतदेह शवविचेदनासाठी संगमनेर कुटीर रुग्णालयात आणण्यात आले. भाऊसाहेब कारभारी खर्डे यांनी तालुका पोलिसांत फिर्याद दिली असून यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
close