रेडा ग्रामपंचायतवर भाजपचा झेंडा
इंदापूर प्रतिनिधी: (१९ जाने.२१)
दि.१८ रेडा (गुलाबनगर )इंदापूर तालुक्यातील रेडा गावातील ग्रामपंचायत निवडणूक २०२१ साठी (दि.१५) रोजी मतदान झाले होते. (दि.१८) रोजी मतमोजणी झाली असून रेडा ग्रामपंचायत वर भारतीय जनता पार्टीचे वर्चस्व आले असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा धुव्वा उडला आहे. भारतीय जनता पार्टी ७ जागा मिळाल्या असून राष्ट्रवादीला २ जागेवर काठावर विजय झाला आहे.
इंदापूर तालुक्यातील ५७ ग्रामपंचायतीच्या निवडणूक कार्यक्रम जाहिर झाला होता. (दि.१५) रोजी ग्रामपंचायत मतदान झाले होते. सोमवार दि.१८ रोजी मतमोजणी पार पडली. पहिल्या फेरीपासून भारतीय जनता पार्टीचे सर्वच उमेदवार आघाडीवर होते .
रेडा ग्रामपंचायतीच्या सर्व उमेदवाराचे निकाल पुढील प्रमाणे, वार्ड क्र. १ मध्ये भारतीय जनता पार्टीचे २ व राष्ट्रवादीचा १ उमेदवार विजय झाला आहे. वार्ड क्र. २ भारतीय जनता पार्टीचे ३ ही उमेदवार प्रचंड मताने विजय झाले असून , वार्ड क्र. ३ मध्ये भारतीय जनता पार्टीचे २ व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा १ विजयी झाला आहे. श्रीराम ग्रामविकास पॅनलचे तीन उमेदवार मोठ्या मतांच्या फरकाने पराभूत झाले आहेत.
जनसेवा ग्रामविकास रेडा (गुलाबनगर) भारतीय जनता पार्टीचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे - वार्ड क्र. १ धनंजय मारूती गायकवाड - ३१५ , २) सौ.कीर्ती तुकाराम सोनटक्के - २६३ , वार्ड क्र. २ उषा धोंडीराम कांबळे - ३६३ , सौ. राजश्री मच्छिंद्र पवार - ३५०, सौ. सुनीता नानासाहेब देवकर ३६०, वार्ड क्र. ३ सचिन हरिश्चंद्र देवकर - २८२, सौ. स्वाती सोमेश्वर देवकर - ३४८, जनसेवा ग्रामविकास रेडा (गुलाबनगर) पराभूत उमेदवार- सौ.राणी नीलकंठ मोहिते- २६४, सौ.रेश्मा धर्मेंद्र देवकर - २४९, श्री सर्जनाथ भैरवनाथ ग्रामविकास पॅनल( राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ) वार्ड क्र. १ विजय उमेदवार - सौ. प्रभावती धर्मराज देवकर - २७४,वार्ड क्र.३ सौ. सीता मारुती मोहिते २७६, श्री सर्जनाथ भैरवनाथ ग्रामविकास पॅनलचे ( राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ) पराभूत उमेदवार पुढीलप्रमाणे - वार्ड क्र. १ जालिंदर नारायण देवकर - २१० , सौ. शशिकला तानाजी चव्हाण - २६० ,वार्ड क्र.२, पराभूत उमेदवार - सौ. नंदा धनंजय माने २२३ ,सौ.मयुरी सतीश बोराटे - २२४, सौ. अंबिका सचिन देवकर -२२५, वार्ड क्र.३ , सौ. मीना हनुमंत यादव- २६७, श्रीराम ग्रामविकास पॅनल पराभूत उमेदवार - नवनाथ शिवाजी गायकवाड -८२ , सौ. उमा नागेश गायकवाड - ७९, वार्ड क्र. २ पराभूत उमेदवार - शशिकांत राजेंद्र सोनटक्के - १४ , नोटा मतदान खालील प्रमाणे मतदान झाले आहे . वार्ड क्र. ३ एकूण नोटा मतदान १५, वार्ड क्र.२ एकूण नोटा मतदान ११, वार्ड क्र.१ नोटा मतदान - ७, वार्ड क्र. २ मध्ये पोस्टल मतदान तीन आल्यालं असून त्यातील दोन मते जनसेवा ग्रामविकास पॅनल म्हणजेच भारतीय जनता पार्टीच्या बाजूने झालं असून तर एक मतदान राष्ट्रवादीच्या बाजूने झालं आहे .वार्ड क्र.१ मध्ये एक मतदान पोस्टल झालं आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाजूने झालं आहे.
----------------------------------
चौकट :-
*विकासाच्या गप्पा मारणाऱ्यां पुढाऱ्यांना दाखवला कृष्णेचा घाट*
रेडा गावात साडेतीन कोटीचा विकास केला असे सांगणारे व जाहिरनाम्यात घोषणा करणारे , विकासाच्या नावाखाली टक्केवारीत रस्ता, पूल, मशानभुमी, शौचालय याच्यामध्ये भ्रष्टाचार करणाऱ्या गाव पुढाऱ्यांना कृष्णाचे घाट दाखवलेला असून तालुका लेव्हलच्या मोठ्या पुढारीमध्ये स्वतःचे स्वयंघोषित गणना करणाऱ्या पुढाऱ्यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे . शंभर ते दीडशे मतांच्या फरकाने पराभव पत्करावा लागला आहे. विकासाच्या पोकळ गप्पा मारणाऱ्यांचा पराभव कसा झाला आणि रेडा गावातील मतदाराने नेमका कसा कृष्णेचा घाट दाखवला यांची रेडा गावातील मतदारामध्ये यांची चर्चा आहे.. येणाऱ्या काळामध्ये विजय सातही उमेदवार भारतीय जनता पार्टीचे आणि पराभूत दोन झाले असले तरी ही ते दोन्ही मिळून नऊ जण विकासाची काम करणार आहोत असे विजय सभेत विजयी उमेदवार यांनी आपलं मत व्यक्त केले.विरोधासारख्या विकासाच्या पोकळ गप्पा मारणार नाही. विकासाच्या नावाखाली टक्केवारीत पैसे खाणार नाही अशी विजय सभेमध्ये मनोगत व्यक्त केले.
*नानासाहेब देवकर *
विजयी उमेदवार - जनसेवा ग्रामविकास पॅनल रेडा (गुलाबनगर)

