कोपरगाव । प्रतिनिधी(विशाल लोंढे):
रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्या तील वडगाव या गावातील एका अडीच वर्षीय आदिवासी चिमुरडीवर एका नरधमाने अत्याचार करत तिला जिवे मारण्याची निंदनीय घटना महाराष्ट्रात घडली असुन सदरील माणुसकीला काळीमा फासनार्या घटणेमुळे सर्वत्र आदिवासी समाज तसेच आदिवासी संघटना आक्रमक झालेल्या आहेत. ही परिस्थिती पाहता घटना स्थळी पोलसांनी दाखल होऊन अरोपीस अटक केली आहे.
परंतु आजही अल्पसंख्याक समाजावर अन्याय होतच आहेत. या अनुषंगाने आज "एकलव्य आदिवासी परिषद संघटना म.राज्य" संस्थापक मंगेश भाऊ औताडे यांच्या मार्गदर्शनाखाली एकलव्य आदिवासी परिषद महिला आघाडी तालुका अध्यक्ष अनिताई गांगुर्डे; महिला कार्यकारणी प्रमुख(प्रवक्ता)सिमा ताई मोरे, महीला कार्यकारणी संघटक कविता ताई पवार; सरलाई माळी, मुक्ताबाई माळी, तालुका संघटक दादासाहेब मोरे,तालुका टा फो सं आनंदजी आहीरे, ता. मार्गदर्शक विठ्ठलराव सोनवणे,कैलासराव सोनवणे,जग्गनाथ पवार,नंदु भाऊ माळी आदि उपस्थित होते.
या प्रसंगी अनेकांनी सदरील घटनेचा जाहीर निषध नोंदवला आहे. त्यामध्ये एकलव्य आदिवासी परिषद संस्थापक मंगेश भाऊ औताडे,देशभक्ती युवा मंच अध्यक्ष रवी भाऊ जगताप,मुस्लिम युवा मोर्चा निसार भाई शेख,बामसेफ (मुस्लिम संघटना प्रमुख) अकबर भाई शेख,सिमाताई मोरे आदींच्या निवेदनावर सह्या आहेत
तर या प्रसंगी महिला आघाडी प्रवक्ता सिमाताई मोरे यांनी प्रतिक्रीया दिल्या की आज या महाराष्ट्रात चिमुरड्या मुली सुरक्षीत नाहीत ही शोकांतिका असुन सदरील आरोपीस फाशीची शिक्षा द्यावी. अन्यथा महिला आघाडी सपुर्ण महाराष्ट्र भर आंदोलन छेडेल तर संस्थापक अध्यक्ष मंगेश भाऊ औताडे म्हणाले की सदर घटना अतिशय माणुसकीला कलंक लावणारी घटना आहे.याप्रसंगी शासनाने योग्य पाऊल उचलावे अन्यथा एकलव्य आदिवासी परिषद संघटना तसेच महीला आघाडी संपुर्ण महाराष्ट्रात आंदोलन छेडेल.तर मुस्लिम युवा मोर्चा प्रमुख निसार भाई शेख म्हणाले की सदरील अरोपीस दिशा कायदेअंतर्गत फाशीची सजा द्यावी व मयत चिमुरडीला न्याय द्यावा.

