shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

५६ ग्रामपंचायतीचा सार्वत्रिक निवडणुकांचा निकाल जाहीर..!

नगर । प्रतिनिधी (शिवा म्हस्के):
कई खुशी कई गम अनेक दिग्गजांना घरचा आहेर तर काही ठिकाणी  घराणेशाही राखण्यात यशस्वी..!

तरुणाईचा दबदबा या निवडणुकीच्या निमित्ताने दिसून आला..!

नगर तालुक्यातील अति महत्वाच्या ग्रामपंचायतीचा सार्वत्रिक निवडणूका चा निकाल जशी च्या तसाच आपल्या हाती निकालाची माहिती आम्ही तुम्हाला ती देत आहोत. विशेष लक्ष असलेले गाव म्हणजे हिवरे बाजार  ग्रामपंचायत कडे आख्या महाराष्ट्र राज्याचे लक्ष  लागुन होते.. 
पोपट पवार यांना २८२ मते मिळाली तर प्रतिस्पर्धी उमेदवार यांना ४४ मते मिळाली ग्रामपंचायतची सत्ता एक हाती राखण्याचं काम पोपट पवार यांचा आदर्श ग्रामविकास पॅनल नी ७ पैकी ७ जागांवर विजय मिळविला आहे.

तसेच हातवळण बाळासाहेब मेटे यांनी ७ जागावर बाजी मारली, वाटेफळ रवी अमृते यांच्या ५ जागा तर दत्ता नारळे २ जागा..

टाकळी काझी संपतराव म्हस्के यांचे चिरंजीव अरुण म्हस्के पराभूत तर शिवसेनेची सत्ता ८-१  अशी टक्कर झाली. डोंगरगण येथे सत्ता परिवर्तन कैलास पठारे यांना पराभाव स्विकारावा लागला...

तर मांजरसुंबा जालिंदर कदम यांना पुन्हा जनतेने कौल दिला आहे.... ; खंडाळा संदेश कालेॅ यांच्या हाती ६ जागा तर भाजप ३ जागेवर..

मांडवे परिवर्तन महाविकास आघाडीची सत्ता सुभाष निमसे ७ जागावर विजयी.. सुभाष निमसे बबनराव पाचपुते समर्थक.ईसळक संजय गेंरंगे गटाने सत्ता राखली..

भोरवाडी सभापती रामदास भोर यांना धक्का भाजपाने या ठिकाणी डाव जिंकला.

गुंणवडी महाविकास आघाडी सत्ता नागवडे गटाला धक्का..
बहिरवाडी ६ विरूद्ध-१ राजु दारकुंडे यांची सत्ता.

ईमापुर गोविंद मोकाटे ५-४.
कामरगाव मध्ये तुकाराम कोतरे गुरूजीची सत्ता..
वाळुंज १०-१ बाजार समिती उपसभापती संतोष म्हस्के यांना सत्ता राखण्यात यश आले..

विळद आडसुरे जगताप गटांचा पराभव २-९ रमेश जवरे गटाचा विजय...!

रुईछत्तीसी ७-४ रमेश भांबरे ६ जागा मात्र स्वतःपराभुत.
खारेकर्जुने प्रताप शेळके यांनी ११ जागा जिंकल्या कै.दादा पाटलांचा राजकिय वारसा कायम...

देहरे जनसेवा पॅनल विजयी ..अंबादास काळे,संजय शिंदे,अरुण लांडगे, यांच्या गटाच्या ७ जागा.
देहरे एकूण निकाल
लोकसेवा 5
जनसेवा 7
अपक्ष 1

शिंगवे सुनिल जाधव गटाच्या ७ जागा.

नवनागापुर बबन डोंगरे यांची. सत्ता १३ जागा ताब्यात बंडु सप्रे ४ जागा वर विजयी..

दरेवाडी मध्ये माजी सरपंच अनिल करांडे यांना १३ जागांवर विजय मिळविला आहे ते गड राखण्यात यशस्वी झाले...
नगर तालुक्यातील शेवटच्या हद्दीवर असलेले गाव गुंडेगाव येथील माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ यांच्या गटाला ६ जागा तर ‌विरोधी गटाला ६ जागा एक अपक्ष  सत्तेच्या चाव्या अपक्ष उमेदवारांच्या हातात... 
बुर्हानगर १५ पैकी ८ जागा या आधीच बिनविरोध झाल्या होत्या उर्वरित ७ जागा साठी निवडणूक लागली होती आजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी ७ पैकी ७ जागांवर बाजी मारुन एक हाती सत्ता राखण्यात यशस्वी झाले..

शिराढोण गावातील ५ जागांसाठी बिनविरोध निवड झाली होती.. उवरवरी ३ जागा साठी निवडणूक लागली होती त्यात विजयी उमेदवार निलेश दरेकर, परशुराम वाघ यांच्या मातोश्री, मच्छिंद्र थोरात सध्या तरी दादासाहेब दरेकर यांचे पारडे जड दिसत आहे. एका जागांची सहा महिन्यांत पोटनिवडणूक होणार आहे.

निंबळक माधवराव लामखडे ११ जागा  विजयी,अविनाश कोतकर,दिलीप पवार ६ जागावर विजयी,

चोचोंडी पाटील महाविकास आघाडी १५ पैकी ९,जागा प्रविण कोकाटे यांना यश, शरद पवार यांना २, बाजीराव हजारे ३ जागांवर विजयी,

जेऊर महाविकास आघाडी पॅनल ९ जागांवर विजय तर माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या गटाला ८ जागावर विजय मिळविला आहे.

मठपिंप्रि माजी सरपंच अंकुश नवसुपे, सुभाष बोरकरांच्या पॅनलच्या ७ जागांवर विजय मिळविला आहे आपल्या हाती एक हाती सत्ता राखण्यात यशस्वी झाले आहेत...

ईसळक ९ पैकी ९ उमेदवार विजयी झाले पॅनल प्रमुख संरपच  संजय गेंरंगे..
close