केज । जिल्हा प्रतिनिधी प्रकाश मुंडे :-
केज शहर म्हणले की संस्कृतीचा वारसा जपणारे स्थान. स्वामी समर्थांच्या व ख्वाजा गरिब नवाज यांच्या पावनस्प्रशाने व वास्तव्याने पावन झालेली भुमी म्हणजे केज ( शहर). परंतु सद्य स्थितीत केज शहरात अवैध धंद्यांचे स्तोम माजले आहे. मटका खुलेआम केज शहरात चालू आहे. तो पण केज शहरातील मोक्याच्या ठिकाणी गाळे भाड्याने करून.
ना जागा मालकाला पोलिसांची कारवाईची भिती ना मटका खुलेआम चालवणाऱ्या बुकी मालकांना.
या अवैध दारू, मटक्यामुळे अनेक कुटुंबाचे संसार उघड्यावर पडले आहेत. तर काही जणांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. घरातील कमावणारा माणुस या मटक्यामुळे दारू मुळे चार कमवलेले पैसे मटका व दारू पिण्यामध्ये घालवत आहे. या मुळे त्यांच्या कुटुंबात रोज भांडणे होत आहेत.
परंतु या सगळ्याचा ना मटका चालवणाऱ्या बुकी ना, ना प्रशासकीय यंत्रणेला देणे घेणे आहे.
त्यामुळे केज शहरातील नागरिक, पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते यांच्या कडून केज शहरातील अवैध धंदे मटका व दारू बंद करण्यची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे.
शहरातील अवैध धंदे चालवणाऱ्या लोकांची मोठ मोठे बॅनर पण सद्या केज मध्ये चर्चेचे विषय बनले आहेत.
या सर्व प्रकारच्या अवैध धंद्यांना पोलीस प्रशासन पाठीशी घालत आहे अशी चर्चा केज मध्ये सुरू आहे.
या अवैध धंद्यां वाल्यांनी केज शहरातील मोक्याच्या ठिकाणी गाळे थाटल्यामुळे व या दुकानासमोर येणाऱ्या दारू पिद्दाड्यामुळे, शाळा, काॅलेज व शिकवणी साठी जाणाऱ्या विद्यार्थी व मुलींना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे.
हे लोक रस्त्यावर भांडणे व धिंगाणा घालून शहरातील वातावरण बिघडून टाकत आहेत.
या सर्व प्रकारा मुळे आता तरी केज शहरातील पोलीस प्रशासनाने या सर्व अवैध धंद्यांवर कडक कारवाई करून हे सगळे अवैध धंदे बंद करावेत अशी मागणी जोर धरू लागली आहे.
हे अवैध धंदे बंद झाले तर केज शहरातील गरिब जनतेच्या संसारात व कुटुंबात आनंद व सुख समाधान निर्माण होण्यासाठी मदत होणार आहे. हे तितकेच खरे.
केज पोलीस या अवैध धंद्यांवर कडक कारवाई करतील एवढीच माफक अपेक्षा केजकरांना पोलीस प्रशासना कडून आहे.

