पिठेवाडीच्या रस्त्यांची दुरावस्था..!!
इंदापूर प्रतिनिधी (तात्याराम पवार)
बावडा: (१० जाने.२१) पिठेवाडी ते लाखेवाडी व पिठेवाडी ते बावडा या रस्त्यांची अतिशय बिकट अवस्था झालेली असून या रस्त्यामध्ये मोठमोठे खड्डे अतिवृष्टीच्या काळात रस्त्यावरची खडी मोठ्या प्रमाणात उघडी पडल्यामुळे रस्त्यावरून वाहने चालवत असताना चालकांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते आहे.
या रस्त्यावर सदर रात्री-अपरात्री या ठिकाणच्या ग्रामस्थांना शेती, दूध व्यवसाय, कारखाना, हॉस्पिटल इत्यादी गोष्टीसाठी या दोन्हीही ठिकाणच्या रस्त्याने ये जा करावी लागत असते. सदर रस्त्याची दुरवस्था पाहता असताना निदर्शनास येत आहे की, जागोजागी मोठमोठे खड्डे, अतिवृष्टीच्या पाण्यामुळे जागोजाग रस्त्यावरील खडी वाहून गेली आहे. रस्त्याच्या कडेने ओडा असल्याने पाण्याच्या प्रवाहामुळे सदर रस्ता मोठ्या प्रमाणात खचला आहे. अशा खचलेल्या ठिकाणी रात्रीच्या वेळी अपघात होण्याची दाट शक्यता आहेत. अशी दयनीय अवस्था या रस्त्यांची असूनही संबंधित विभागाने याकडे दुर्लक्ष केले की, काय? असे ग्रामस्थांना वाटत आहे. आधीच कोरोनाचे संकट त्यामध्ये अतिवृष्टीने झालेले नुकसान आणि या रस्त्यांची दयनीय अवस्था अशा संकटांना येथील ग्रामस्थ त्रस्त असल्याचे दिसून येत आहे.तरी या दोन्ही रस्त्यांची तातडीने कामे होणे गरजेचे असल्याचे पिठेवाडी येथील ग्रामस्थ यांची मागणी आहे.

