शेती पिकांचे मोठे नुकसान.
संगमनेर। प्रतिनिधी(ऋषिकेश जगताप):
घारगाव पठार भागात अवकाळी पावसामुळे बळीराजाला मोठा फटका बसला आहे. अवकाळी पावसामुळे बळीराजाचे मोठे नुकसान झाले आहे.
यामध्ये घारगाव पठार भागात कांदा, गहू ,हरभरा, द्राक्षे,आणि, मका पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने शेतकऱी अक्षरश: हवालदिल झाले आहेत.घारगाव पठार भागातील शेतकरी एका मागून एक आधीच संकटांवर मात करून रब्बी साठी शेतकरी सरसावला होता. माघाची कांदा रोपे घेऊन कांदा लागवड केले आहे. सतत हवामान बदलत असल्यामुळे कांदा ,गहू, हरभरा वर झालेले रोगाच्या प्रादुर्भावा पासून बचावासाठी महागडी औषध खरेदी करून शेतकऱ्यांनी फवारणी केली आहे. एवढा खर्च केल्यानंतर शेतकऱ्यांच्या तोंडाला आलेला घास या अवकाळी पावसाने हिरावून घेतला आहे.
शेतकऱ्याच्या कांदा पिकात पाणी साचल्याने शेतकरी आता चिंताग्रस्त दिसत आहे. आणि शासन यावर काय निर्णय घेणार ..? याकडे संकटग्रस्त बळीराजाचे लक्ष लागून आहे.

