शिर्डी (प्रतिनिधी):
शिर्डी येथील श्री द्वारकमाई वृद्धाश्रमाला प्रसिद्ध सिने अभिनेते सोनू सूद यांनी भेट दिली व तेथील वृद्धाश्रमात असणाऱ्या वयोवृद्ध लोकांशी, महिलांशी चर्चा केली,यामुळे येथिल वृद्ध आश्रमातील सर्वच भरून गेले होतेे. हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध सिने अभिनेता आपल्याला भेटण्यासाठी येथे आला.या कल्पनेने येथील वृद्ध आश्रमातील वृद्ध पुरुष व महिला यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. सर्वाना मोठा आनंद झाला होता. शिर्डीला अनेक मोठे नेते अभिनेते येतात.मात्र आम्हाला भेटण्यासाठी कोणी आलं तर आम्हाला खूप मोठा आनंद होतो. असे येथील वृद्धाश्रमातील माता-पिता बोलत होते.येथील वृद्ध मातापित्यांशी सोनू सूद यांनी मनमोकळेपणाने यथेच्छ गप्पा मारल्या.येथील वृद्धांची सेवा करणाऱ्या श्रीनिवास भैय्या यांचेही त्यांनी कौतुक केले.
श्री निवास भैय्या यांचे कार्य फार महान असल्याचेही यावेळी सोनू सूद यांनी म्हटले. आपले सर्व घरदार ,नातेवाईक सोडून येथे वृद्धाश्रम टाकून वृद्धाश्रमात आलेल्या माता-पित्यांची सेवा करण्याचे भाग्य श्रीनिवास यांनी घेतले आहे. आपणही येथील मातापित्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहोत. असे सांगत श्रीनिवास हे मोठे महान व्यक्तिमत्व असल्याचे व ते प्रसिद्धीपासून दूर पण सर्वात महान कार्य करत आहेत.असे यावेळी ते म्हणाले .सोनू सूद यांनी या आश्रमाला भेट दिल्यानंतर या वृद्धाश्रमातील वृद्ध मातापित्यांचे चेहरे फुलले होते.टीव्हीवर किंवा टीव्हीवरील चित्रपटात दिसणारा सिनेअभिनेता प्रत्यक्ष भेटीला आल्याचे पाहून अनेकांनी विशेषतः लहान मुलांनी सोनू सूद यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या. वृद्ध तसेच लहान मुले यांनी सोनू सूद यांचेसमवेत फोटो काढले.मनमोकळ्या गप्पा मारल्या.येथे बराच वेळ सोनू सूद ने दिला.
यावेळी त्यांच्याबरोबर भारतीय जनता युवा मोर्चाचे शिर्डीतील जेष्ठ नेते सचिन तांबे, अरुण त्रिभुवन तसेच या वृद्धाश्रमातील मॅनेजर,कर्मचारी आदी उपस्थित होते. त्यामुळे सोनू सूद या अभिनेत्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. सोनू सूद ने वृद्धाश्रमाला भेट दिल्यामुळे शिर्डीकंरामधूनही व साईभक्ता मधूनही सोनू सुदचे मोठे अभिनंदन होत आहे.

