shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

ग्रा.पं.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे सोनईत संचलन..!!


प्रतिनिधी। मोहन शेगर :
सोनई- सोनई ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोनई पोलीस ठाण्याचे अधिकारी स. पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे व ज्ञानेश्वर थोरात यांच्या मार्गदर्शना खाली १२ पोलीस, १८   आर.सी.पी.कर्मचारी व २ होमगार्ड आदींनी गावातून रूट मार्च ( संचलन) केले.

नेवासा तालुक्यातील महत्वाची समजली जाणारी सोनई ग्रामपंचायत ची निवडणूकित कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी समाजकंटकाना प्रतिबंधक कायदा उपाय म्हणून कारवाईचे आदेश जारी करून निवडणूक प्रक्रिया शांतपणे पार पडण्यासाठी पोलीस प्रशासन सर्व हालचालींवर बारीक लक्ष ठेऊन निवडणूक प्रक्रिया साठी सज्ज झाल्याची माहिती स.पो. नि.रामचंद्र कर्पे यांनी दिली.

ग्रामपंचायत निवडणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच निवडणूक शांततेत पार पडावी व कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी पोलिसांच्या वतीने गावात संचलन करण्यात आले आहे.
close