सावळीविहीर (प्रतिनिधी):
भंडारा जिल्ह्यातील सामान्य जिल्हा रुग्णालयात आज पहाटे रुग्णालयात आग लागून दहा बालकांचा मृत्यू झाला ही घटना मोठी दुर्दैवी झाली असून अशा घटना राज्यांमध्ये कोणत्याही शासकीय रुग्णालयात होऊ नये यासाठी आरोग्य विभागाने विशेष दक्षता घेऊन जिल्हा स्थानिक प्रशासनाला सक्ती ने त्यासाठी आदेश द्यावेत.असी सूचना आपण आरोग्य मंत्री ना. राजेश टोपे यांना केली असल्याची माहिती माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिली.
प्रफुल्ल पटेल हे श्री साईबाबांच्या दर्शनाला दरवर्षीच्या सुरुवातीलाच येत असतात. त्याप्रमाणे ते यावर्षीही नववर्षाच्या सुरुवातीला आज शनिवारी शिर्डीत आले होते. त्यांनी श्री साईबाबांचे मनोभावे दर्शन घेतले.
शिर्डीत पत्रकारांशी बोलताना प्रफुल्ल पटेल म्हणाले की, माझ्या भंडारा जिल्ह्यात आज शनिवारी पहाटे जिल्हा सामान्य रुग्णालयात आग लागून दहा बालकांचा मृत्यू झाला आहे. ही मोठी दुःखद घटना घडली आहे.
यासंदर्भात मी राज्याचे गृहमंत्री नामदार अनिल देशमुख यांच्याशी चर्चा केली असून ते भंडारा मध्ये पोहोचले आहेत. त्याच प्रमाणे भंडारा जिल्ह्यात अशी घटना घडली .अशा घटना राज्यातील कोणत्याही शासकीय रुग्णालयांमध्ये यापुढे घडू नयेत. यासाठी मी आरोग्य मंत्री नामदार राजेश टोपे यांच्याशी चर्चा केली असून स्थानिक जिल्हा प्रशासनाला सक्तीने आदेश करून अशा घटना यापुढे होऊ नयेत असेही सांगितले असल्याचे पटेल म्हणाले,
तसेच भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात जी घटना घडली त्याची चौकशी होईलच व त्यासंदर्भात कोणाचा निष्काळजीपणा होता. कोण दोषी आहे? त्यावर हि कडक कारवाई करण्याची मागणी आपण मंत्र्यांकडे केली आहे. असे यावेळी प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले. त्याचप्रमाणे औरंगाबाद जिल्ह्याचे नामकरण करण्याची गेल्या काही दिवसापासून चर्चा मोठी राज्यात सुरू आहे. मात्र महा विकास आघाडीतील घटक पक्ष असणाऱ्या शिवसेनेने औरंगाबादचे नामकरण करत संभाजीनगर केले आहेच.
मात्र शासकीय निर्णय हा महाविकासआघाडी तिन्ही पक्षांच्या दोन दोन कॅबिनेट मंत्री असणाऱ्या समन्वय समितीच्या बैठकीत चर्चेला जाऊन त्यावर निर्णय होऊन तो मंत्रिमंडळापुढे येईल व मग मंत्रिमंडळात तो निर्णय होईल .असे पटेल यांनी यावेळी नामांतरण याविषयी सांगितले.

