रस्ता सुरक्षा अभियानाला इंदापूर मध्ये सुरवात..!!
इंदापूर (प्रतिनिधी): दि.२२. इंदापूर तालुक्यातील नागरिकांना रस्ते वाहतुक नियमाच्या जागृतीसाठी महामार्ग पोलीस इंदापूर तसेच इंदापूर पोलीस वाहतूक शाखा यांच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या ३२व्या रस्ता सुरक्षा अभियान २०२१ च्या मोहिमेचा मा.बांधकाम आरोग्य व बांधकाम सभापती तथा जिल्हा परिषद सदस्य प्रविण माने यांच्या शुभहस्ते उदघाटन पार पडले.
बत्तीसावा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह १८ जानेवारी ते १७ फेब्रुवारी दरम्यान संपूर्ण राज्यभर राबवण्यात येत असून इंदापूर महामार्ग पोलीस मदत केंद्राकडून देखील वाहतुकीच्या नियम व सुरक्षित प्रवासाबाबत जनजागृती करण्यात येत आहे. यासाठी इंदापूर महामार्ग पोलीस मदत जनजागृती रथ बनवला असून माने यांच्या हस्ते आज गुरुवार दि.२१ रोजी उद्घाटन करण्यात आले.
१८ जानेवारी ते १७ फेब्रुवारी या कालखंडात इंदापूर तालुक्यासह पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वाहन चालकांमध्ये वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती करण्यात येणार असून रहदारी विषयक सुचना महामार्ग पोलीस मदत केंद्राकडून सर्व नागरिकांना देण्यात येणार आहेत.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने माध्यमांशी बोलताना माने यांनी नागरिकांना सीटबेल्ट, हेल्मेट, यांसह मद्यपान करून होणारी वाहतूक टाळावी या विषयी प्रतिपादन केले.
बाबा चौक इंदापूर येथे पार पडलेल्या या कार्यक्रमास महामार्ग पोलीस मदत केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बी.व्ही.भुसनूर, स.पो.निरीक्षक धनवे, स.पो.उपनिरिक्षक विठ्ठल कदम, पो.काॅ.माने, पो.ना.मिसाळ,पो.काँ.गवळी, पो.ना. बनसोडे, पो.ना.जगताप, पो.ना.कदम सुग्रीवनाना बोंगाणे, पांडुरंग तात्या मारकड इतर मान्यवर उपस्थित होते.

