shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

त्या पोलीस कर्मचाऱ्या विरुद्ध कारवाई न झाल्यास... इंदापूर पोलीस स्टेशन समोर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा पत्रकार परिषदेमध्ये दिला विवाहित महिलेने इशारा..!!

त्या पोलीस कर्मचाऱ्या विरुद्ध कारवाई न झाल्यास... इंदापूर पोलीस स्टेशन समोर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा पत्रकार परिषदेमध्ये  दिला विवाहित महिलेने इशारा..!!
इंदापूर प्रतिनिधी:(२२ जाने.२१)अवैद्य गुटख्याचा संशय घेत घरात घुसत पोलीसाने असभ्य वर्तन केल्याचा गंभीर आरोप एका विवाहित महिलेने केला आहे. या संदर्भात तिने इंदापूर पोलीस ठाण्यात व पोलीस अधिक्षकांकडे तक्रारी अर्ज केलेला असून तात्काळ त्या पोलीस कर्मचाऱ्या विरूद्ध कारवाई न झाल्यास परवा पासून इंदापूर पोलीस ठाण्यासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा या महिलेने दिला आहे.

सविस्तर हकिकत अशी की,दि.१९ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता च्या दरम्यान सदर महिला एकटीच घरी होती. दरम्यान घराचे गेट वाजल्याचा तिला आवाज आला.कोणीतरी आले असेल असा प्राथमिक अंदाज तिने लावला आणि त्याकडे दुर्लक्ष केले असे या महिलेचे म्हणणे आहे. नंतर स्वयपाक घराच्या दरवाजाचा आवाज आला असता तिने पाहिले तर एक अनोळखी व्यक्ती घरात आली आहे. त्याने दरवाजाची कडी लावून दरवाजा बंद केला.सदर इसमास महिलेने आपण कोण आहात अशी विचारणा केली.त्यावर आपण पोलीस आहे,तुझा नवरा कुठे आहे व गुटखा कुठे लपवला आहे सांग नाहीतर तुला उचलून घेऊन जाईल असे म्हणाले.त्यावर महिलेने अगोदर दरवाजा उघडा व मला बाहेर जाऊ द्या अशी विनंती केली. मात्र दरवाजा उघडला नाही हे पाहून महिलेने आरडा ओरडा केला असता सदर पोलीस कर्मचाऱ्याने महिलेच्या हाताला धरुन दरवाजा पासून लांब ढकलून दिल्याचा आरोप तिने केला आहे.

त्यानंतर सदर कर्मचारी दार उघडून घराबाहेर गेला त्यानंतर मी ही त्याच्यामागे बाहेर येऊन पाहिले असता आणखी तीन लोक बाहेर दारात उभे होते.हिचा नवरा नाही तर हिला घेऊन चला असे म्हणून ते सर्व तेथून निघून गेले असे महिलेने तक्रारी अर्जात म्हटले आहे.वरील सर्व प्रकार तिने आपल्या चुलत जावांना सांगितला व चार च्या सुमारास इंदापूर पोलीस स्टेशन ला तक्रार देण्यासाठी आलो. मात्र तीन तास बसल्यानंतर ही आमची तक्रार घेतली नाही.वरील सर्व प्रकार माझ्या घरी कोणी नसताना घडला आहे.कायद्याच्या रक्षकांनीच असे वागले तर आम्ही न्याय कुठे मागायचा असा संतप्त सवाल देखील तिने केला आहे.जर दि.२३ जानेवारी पर्यंत सदर कर्मचाऱ्या विरूद्ध कार्यवाही झाली नाही तर मी व माझे कुटुंबीय इंदापूर पोलीस स्टेशन समोर बेमुदत धरणे आंदोलनास बसू असा इशारा ही तिने लेखी तक्रारीद्वारे थेट पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण यांना दिला आहे.

या संदर्भात बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव अँड.राहुल मखरे यांनी आज गुरूवार दि.२१ रोजी पत्रकार परिषद घेत इंदापूर पोलीस हे नेहमीच खोटे गुन्हे दाखल करत असून दि.२० जानेवारी रोजी देखील गुटक्या संदर्भात वसीम शेख यावर खोटा गुन्हा दाखल केलेला आहे.या गुन्ह्यात त्यास अडकवून त्याला नाहक त्रास देण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. कारण इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक नारायण सारंगकर यांच्या कारवाई संदर्भात बहुजन मुक्ती पार्टीने जो बंद पुकारला होता या बंद मध्ये वसीम शेख याने नेतृत्व केले होते.त्याचाच राग मनात धरुन सारंगकर यांच्या सूचनेनुसार पोलिसांनी हा कट रचून वसीम शेख याच्यावर खोटा गुन्हा दाखल केला आहे. दुसरी गंभीर बाब म्हणजे त्याच्या घरी जावून त्याच्या पत्नीसोबत असभ्य वर्तन केलेले आहे.पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात जो  वेळ नमूद केले आहे त्यावेळेस वसीम शेख हा माझ्यासोबत घरी होता. तीन वाजलेपासून ते साडेचार वाजेपर्यंत तो माझ्या सोबत घरी असल्याचे सी.सी.टी.व्ही. फुटेज देखील त्यांनी भर पत्रकार परिषदेत दाखवले.

एकंदरीतच गेले अनेक दिवसांपासून इंदापूर पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर मोठ्या प्रकारचे गंभीर आरोप होत आहेत.त्यावरती अनेक आंदोलने झाली,इंदापूर गांव बंद ही ठेवण्यात आले.त्यामुळे इंदापूर तालुक्याचे लोकप्रतिनिधींनी तात्काळ या प्रकरणात लक्ष घालण्याची मागणी सर्वसामान्य नागरिकांची आहे.
close