shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

२६ हजारांचा नायलॉन व चायनीज मांजा जप्त...!!

संगमनेर शहर पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल.

संगमनेर । प्रतिनिधी(ऋषिकेश जगताप):

बंदी असलेल्या नायलॉन व चायनीज मांजा विकणाऱ्या विरुद्ध संगमनेर पोलिसांनी छापेमारी सुरू केली आहे.

बंदी असलेला नायलॉन व चायनीज मांजा विकणाऱ्या दोघांविरुद्ध संगमनेर पोलिसांनी कारवाई केली असून त्यांच्या कडून २६ हजार रुपयांचा बंदी असलेल्या मांजा 
त्यांच्याकडून जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी एका महिलेसह संगमनेर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. आता या कारवाईनंतर पोलीस निरीक्षक, मुकुंद देशमुख यांनी बंदी असलेल्या मांजा वापरण्यास मनाई केली आहे.

अशा पद्धतीचा माजा जर कुणी विकत असेल तर त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येईल. असा इशारा पोलीस निरीक्षक, मुकुंद देशमुख , यांनी दिला. पोलीस उपाधिकारी राहुल मधने, सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे, देविदास माळी, यांनी गुन्हे प्रकटी शाखेच्या पथकासह शहरी पतंग विक्रेत्यांकडे छापेमारी केली.

यावेळी कुंभारआळा व मालदाड रोड, याठिकाणी पतंग विक्रेत्यांकडे मोठ्या प्रमाणात नायलॉन व चायनीज मांजा आढळून आला व संपूर्ण मांजा जप्त करण्यात आला आहे.
close