shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पत्रकार परिषदेसाठी स्वतंत्र हॉलची संस्थानतर्फे व्यवस्था करण्याचा प्रयत्न! पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात कार्यकारी अधिकारी बगाटे यांचे आश्वासन..!!



सावळीविहीर( प्रतिनिधी):
 श्री साईबाबा संस्थानच्या वतीने शिर्डी मध्ये पत्रकार परिषदेसाठी स्वतंत्र पत्रकार परिषद हॉल ची सुविधा निर्माण करण्याचा संस्थान प्रयत्न करणार असल्याची माहिती श्री साईबाबा संस्थान चे कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी पत्रकार दिनाच्या सत्कार कार्यक्रम प्रसंगी दिली.

शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान च्या वतीने शिर्डी व परिसरातील पत्रकारांचा पत्रकार दिनानिमित्त सत्कार करण्यात आला. यावेळी श्री साईबाबा संस्थान चे मुख्य कार्यकारी अधिकारी बगाटे यांनी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून कोरोनाच्या काळातही पत्रकारांनी चांगले काम केल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. व सर्व पत्रकारांचे अभिनंदन केले.त्याचप्रमाणे शिर्डी हे आंतरराष्ट्रीय तीर्थस्थान असून श्री साईबाबांच्या दर्शनासाठी येथे मोठ्या प्रमाणात साईभक्त येत असतात.

त्याचप्रमाणे येथे सर्व प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे मोठ्या प्रमाणात पत्रकार असून येथे पत्रकार हॉल संदर्भातही त्यांनी चर्चा केली.त्याचप्रमाणे श्री साईबाबा संस्थान यांच्यावतीने येथे अनेक व्हीआयपी साईभक्त, मोठे उद्योगपती ,नेते-अभिनेते, पक्ष संघटनेचे पदाधिकारी अधिकारी, मंत्री हे नेहमी श्री साईबाबांच्या दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे त्यांच्या पत्रकार परिषदा होत असतात. अशा पत्रकार परिषदेसाठी स्वतंत्र पत्रकार परिषद हॉल श्री साईबाबा संस्थान करण्याचा प्रयत्न करेल असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले .त्याप्रमाणे श्री साईबाबा संस्थान तर्फे एक भक्त एक गाय या धर्तीवर येथे विविध जातींच्या 5000 गायांची व सुमारे 25 कोटी रुपये खर्चून गोशाळा उभारण्यात येऊन अनेक जातींच्या गायांचे संरक्षण श्री साईबाबा संस्थान करण्याचा प्रयत्न करणार आहे.

श्री साईबाबा संस्थान प्रसादालय साठी तुप व दूध यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो .श्री साईबाबांच्या श्री द्वारकामाई तील धुनीसाठी नंदुरबार व परिसरातून गवरी आणवी लागतात.या सर्वांचा विचार करता येथे मोठ्या प्रमाणात गोशाळा सुरू करून त्याद्वारे तूप व दूध मिळेल व गवरीही मिळेल. असे यावेळी श्री साईबाबा संस्थान च्या कार्यकारी अधिकारी बगाटे यांनी सांगितले. तसेच शिर्डी शिर्डीतील ग्रामस्थांचे दर्शन सुलभ व्हावे यासाठी संस्थान स्वतंत्र व्यवस्था करण्याचा प्रयत्न करीत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. त्याचप्रमाणे शिर्डी परिसरातील देवस्थाने यांना एकमेकांना जोडून येथे येणाऱ्या साईभक्तांचे परिसरातील देवस्थानचे दर्शन व्हावे यासाठी माफक प्रवास भाड्या करून व्यवस्था करण्याचा प्रयत्न संस्थांचा आहे.त्यामुळे साईभक्त येऊन येथील आर्थिक व्यवहारही वाढेल बाजारपेठही वाढतील. 

साईभक्तांच्या वाहनतळासाठी ही  संस्थान चे नियोजन सुरू आहे. तसेच शिर्डी मध्ये भव्य असे कॅन्सर हॉस्पिटल सुरू करण्याचा संस्थांचा विचार असल्याचे श्री साईबाबा संस्थान चे मुख्य कार्यकारी अधिकारी  कान्हुराज बगाटे यांनी यावेळी सांगितले. सर्व पत्रकारांचा यावेळी साईबाबा संस्थानच्या वतीने पुष्प देऊन सत्कार करण्यात आला व पत्रकार दिनानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या .यावेळी श्री साईबाबा संस्थान चे विविध अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते .कोरोनामुळे अटी व शर्ती राखत हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी शिर्डी व परिसरातील सर्व पत्रकार बंधू उपस्थित होते.
close