shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वालचंदनगर ग्रामपंचायतवर भाजप पुरस्कृत जनसेवा पॅनल अकरा जागा मिळवत विजयी..!!

वालचंदनगर ग्रामपंचायतवर भाजप पुरस्कृत जनसेवा पॅनल  अकरा जागा मिळवत विजयी..!!
इंदापूर प्रतिनिधी:वालचंदनगर येथील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत (दि. १५) रोजी मतदान करण्यात आले असून( दि. १८) रोजी मतमोजणी करण्यात आली. यावेळी वालचंदनगर ग्रामपंचायत च्या निवडणुकीमध्ये भाजप पुरस्कृत जनसेवा पॅनलने ११जागेवर विजय प्राप्त करत एक हाती सत्ता मिळवत पुन्हा एकदा यश खेचून आणले.
 गेल्या पंचवार्षिक मध्ये सत्ता प्राप्त करून माजी सरपंच सौ छाया मोरे यांच्या कार्यकाळात केलेल्या विकास कामाचा फायदा भाजप पुरस्कृत जनसेवा पॅनलला झाल्याचे दिसत आहे. सुरुवातीलाच जनसेवा पॅनलने वार्ड क्र.६ मध्ये दोन उमेदवार बिनविरोध निवडून आणून त्याची सुरुवात केली होती. वालचंदनगर ग्रामपंचायत निवडणुकीत १५ जागा साठी ४३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते.त्यापैकी अकरा जागेवर भाजप पुरस्कृत जनसेवा पॅनलने विजय प्राप्त करून बहुमत मिळवले तर राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत संकल्प पॅनल ला पाच जागा जिंकण्यात यश मिळाले व बहुजन समाज पार्टीने एका जागेवरती यश संपादन केले.
वालचंदनगर ग्रामपंचायतीच्या चुरशीच्या निवडणुकीत भाजप पुरस्कृत जनसेवा पॅनलचे विक्रम मोरे ,सत्यशील पाटील, कुमार गायकवाड ,विश्वजीत तावरे सर, दयानंद झेंडे ,संतोष कदम, सागर भोसले ,संतोष सोनटक्के,आकाश भोसलेयांनी प्रचाराची धुरा सांभाळली.
जनसेवा पॅनलचे विजयी उमेदवार: वार्ड क्र. १ संदीप गुणवंत पांढरे वार्ड क्र.२ मनीषा सत्यशील पाटील ,स्वाती सचिन अचलारे वार्ड क्र.४ संजय सुरेश नकाते, रोहित जगन्नाथ झेंडे, अनिता संतोष गायकवाड .वार्ड क्र.५ संतोष नामदेव गायकवाड, पद्मावती जनार्दन परीट. वार्ड क्र.६ आरती दयानंद झेंडे ,शरद श्रीहरी गायकवाड ,महादेव रायाप्पा कोळी.
राष्ट्रवादी पुरस्कृत संकल्प पॅनलचे विजयी उमेदवार वार्ड क्र.१ वैशाली पोपट मिसाळ. वार्ड क्र.२ अरुण किसनराव वीर .वार्ड क्र.३ अंबादास भानुदास शेळके, प्राजक्ता विनोद कांबळे. वार्ड क्र.५ वैशाली शरद शिवशरण.
बहुजन समाज पार्टीचे हर्षवर्धन अर्जुन गायकवाड.
close